घरमहाराष्ट्रदिवाळी संध्येच्या माध्यमातून भाजपाची मतपेरणी, मुंबईत ठिकठिकाणी आयोजन

दिवाळी संध्येच्या माध्यमातून भाजपाची मतपेरणी, मुंबईत ठिकठिकाणी आयोजन

Subscribe

मुंबई : आगामी निवडणूक आणि मतांचे गणित डोळ्यासमोर प्रत्येक सामाजिक, सांस्कृतिक सण आणि उत्सवांचे राजकीय संधीत रूपांतर करण्यात आघाडीवर असलेल्या भाजपाने यंदा दिव्यांचा सण अर्थात दिपवालीनिमित्त मुंबईत ठिकठिकाणी दिवाळी पहाट, दिवाळी संध्येच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने मतपेरणी करून पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

हेही वाचा – काँग्रेसमध्ये रामाचाही तिरस्कार करणारे नेते, आचार्य प्रमोद कृष्णम यांचा घरचा अहेर

- Advertisement -

मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आमदार Adv. आशिष शेलार यांची नियुक्ती झाल्यापासून भाजपाने सण, उत्सव विशेषतः हिंदू धर्माचे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करायला सुरुवात केली आहे. तशी जाहिरातही भाजपाने मध्यंतरी केली होती. आशिष शेलार यांनी यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली. त्यापाठोपाठ मुंबईच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात असलेला शिवसेनेचा ठसा पुसून काढण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबई भाजपाने शहरात हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले. या सणात गर्दी जमवून भाजपाने मुंबईच्या सांस्कृतिक वातावरणात राजकीय शिरकाव केला आहे.

- Advertisement -

आता दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी पहाट, दिवाळी संध्या या संगीतमय कार्यक्रमांचे शहरात ठिकठिकाणी आयोजन केले आहे. त्याची सुरुवात शुक्रवारपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लालबाग गणेश गल्लीच्या कार्यक्रमातून झाली. आता उद्या, शनिवारपासून दहिसर, वांद्रे रंगशारदा, विक्रोळी कन्नमवार नगर, साहित्य संघ गिरगाव आणि शिवाजी पार्क येथील राजा बढे चौकात दिवाळी पहाट, दिवाळी संध्याचे कार्यक्रम रंगणार आहेत.

हेही वाचा – Maharashtra Kesari : सिंकदर शेखने महाराष्ट्र केसरीचे मैदान मारले; जल्लोषात उचलली चांदीची गदा

ज्या भाजपा कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपाला अनेकवेळा घवघवीत यश मिळाले, ज्यांच्या बळावर आम्ही महाविजय 2024चा संकल्प केला आहे, अशा जनसेवक म्हणून काम करणाऱ्या आमच्या भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासोबत ‘स्नेहमिलन’ करून दीपावलीच्या नमो उत्सवाला सुरुवात केली आहे. या सुरमयी मैफलीत पारंपरिक वेशात, नव्या उत्साहात सहकुटुंब आणि मित्र परिवारासह या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आशिष शेलार यांनी मुंबईकरांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -