घरताज्या घडामोडीऔरंगाबाद: माथेफिरु मुलाकडून आईची कुऱ्हाड घालून हत्या

औरंगाबाद: माथेफिरु मुलाकडून आईची कुऱ्हाड घालून हत्या

Subscribe

एका माथेफिरु मुलाने आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

काही महिन्यांपूर्वी जालना जिल्ह्यात एका दारुड्या मुलाने आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा असाच एक धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये घडल्याचे समोर आले आहे. एका माथेफिरु मुलाने आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

औरंगाबादच्या बाळपूर या गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरु आहे. रमेश घुगे असे, माथेफिरु मुलाचे नाव आहे.

- Advertisement -

दरम्यान, आरोपी रमेश हा मनोरुग्ण असून त्याच्यावर औरंगाबादच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घडलेल्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. शशिकलाबाई घुगे असे मृत आईचे नाव आहे.


हेही वाचा – धक्कादायक! ‘या’ राज्यांनाही मागे टाकत सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -