घरमहाराष्ट्रपं. केशव गिंडे यांना पं. भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर

पं. केशव गिंडे यांना पं. भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर

Subscribe

यावर्षी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ वासरीवादक पंडित केशव गिंडे यांना जाहीर झाला आहे. मंगळवारी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

यावर्षी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ वासरीवादक पंडित केशव गिंडे यांना जाहीर झाला आहे. मंगळवारी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. राज्य सरकारतर्फे दरवर्षी शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारास भारतीय पं.भीमसेन जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारान्वे रोख पाच लाख रुपये मानपत्र, सन्मानचिन्ह देण्यात येते. आतापर्यंत गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. जसराज, डॉ. प्रभा अत्रे, पं. राम नारायण, परवीन सुलताना आणि माणिक भिडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा – ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

- Advertisement -

कोण आहेत पं. केशव गिंडे?

पं. केशव गिंडे यांचा जन्म ५ सप्टेंबर १९४२ रोजी पुण्यात झाला आहे. त्यांनी संगीत विषयात उच्च शिक्षण घेतले आहे. गिंडे यांनी अनेक संगीत मैफीलींत, आकाशवाणी, दूरदरर्शनच्या संगीत सभांमध्ये सहभाग घेतला आहे. १९८४ मध्ये त्यांनी ‘केशव वेणू’ या बासरीची निर्मिती केली. या बासरीची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. ही बासरी तिन्ही सप्तकांत वाजवण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला आहेय. त्यांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पं. केशव गिंडे यांना भारत सरकारद्वारे सिनियर फेलोशिप, सहारा इंडियाकडून जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.


हेही वाचा – लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृती दिनाला ‘मृदगंध पुरस्कार’

- Advertisement -

हेही वाचा – पं. संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -