घरमहाराष्ट्रअशोक चव्हाण सरकारवर नाराज

अशोक चव्हाण सरकारवर नाराज

Subscribe

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन बरेच महिने उलटले असले तरी देखील महाविकास आघाडीतील मंत्र्यांमधील नाराजी नाट्य काही संपता संपत नाही. आता तर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण हेच नाराज असल्याची माहिती समोर येत असून कॅबिनेट बैठकीतच त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे.

पुन्हा एकदा अधिकार्‍यांमुळेच महाविकास आघाडीत नाराजी
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीला अधिकारी जबाबदार असून, आता तर अशोक चव्हाण यांनी देखील संबंधित मंत्र्यांना विचारात न घेता अधिकारी प्रस्ताव मंजुरीसाठी देत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव अधिकार्‍यांनी अशोक चव्हाण यांना न विचारता मंजुरीसाठी मांडल्याने अशोक चव्हाण संतप्त झाले असून, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान याआधी देखील अशोक चव्हाण यांनी नोकरशहांची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

- Advertisement -

अशोक चव्हाण आणि मी भेटतो. आम्ही पक्षात एकत्र आहोत. अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी कदाचित पेरली असावी. खाते विभाजन हा विषय आहे; पण त्यावर योग्य चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. आम्ही थोडी काळजी घेतली तर अजून चांगले काम होईल.
-बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -