घर देश-विदेश डाळींच्या किमती गगनाला भिडल्या; वर्षभरात तूरडाळ 27 टक्क्यांनी महागली

डाळींच्या किमती गगनाला भिडल्या; वर्षभरात तूरडाळ 27 टक्क्यांनी महागली

Subscribe

नवी दिल्ली : देशात डाळींचे भावा गगनाला भिडले आहेत. विशेषत: तूरडाळीच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे. गेल्या वर्षभरात तूरडाळ ही 27 टक्क्यांनी महागली आहे. तूर डाळ महागल्यामुळे मसूर आणि उडीद डाळीचे देखील भाव वाढले आहेत. यंदा पाऊस कमी झाल्याने काही दिवसांत डाळींच्या किमतीत पुन्हा वाढण्याची दाट शक्यता आहे.

केंद्रीय अन्न ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या किंमत निरीक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, 29 ऑगस्ट 2022 मध्ये तूर डाळीची सरासरी किंमत ही 110.66 रुपये प्रति किलो ऐवढी होती. तर तुरीडाळीच्या किमतीत एका वर्षात 140.34 रुपये प्रति किलोपर्यंत वाढली आहे. यामुळे तूर डाळीच्या दरात 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मूग डाळीची सररासरी किंमत 102.35 रुपये प्रति किलो होती. आता ती 111.19 रुपये ऐवढी झाली आहे. वर्षभरात मूग डाळ 8.15 टक्क्यांनी महागली आहे. उडदाची डाळ प्रति किलो 108.25 रुपयांना मिळत होती आणि आता उडीद डाळ 115.02 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. म्हणजे उडीद डाळ ही 6.25 टक्क्यांनी महाग झाली आहे. वर्षभरापूर्वी मसूर डाळीची सरासरी किमत 92.09 रुपये प्रतिकिलो होती आणि आता 97.16 रुपये किलो झाली आहे. सध्या चणा डाळीच्या दरात मोठी वाढ झाली. वर्षभरापूर्वी 74.15 रुपये किलो दराने उपलब्ध होती.

- Advertisement -

हेही वाचा – राखी पौर्णिमेला केंद्राची ओवाळणी! आजपासून घरगुती गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त

कस्टम क्लिअरन्सनंतर डाळींचा साठा करू नये

देशात तूर आणि उडीद डाळीच्या किमती वाढ होत आहे. यामुळे केंद्र सरकारने डाळी आयात करणाऱ्या आयातदरांना कस्टम क्लिअरन्स मिळाल्यानंतर डाळींचा साठा करू नये, महिन्याभरात डाळी भारताच्या भाजारात उतरवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात डाळी उपलब्ध करून देण्यासाठी ‘भारत डाळ’ या नावाने चणाडाळ विक्रीसाठी बाजारात आली असून ही डाळ एनसीसीएफ, नाफेड, केंद्रीय भांडार आणि सफलच्या किरकोळ विक्री केंद्रातून डाळीचे वितरण केले जात आहे.

- Advertisement -

- Advertisment -