घरमहाराष्ट्रजर्मन बेकरी बॉम्ब ब्लास्टप्रकरणी यासीन भटकळ दोषी

जर्मन बेकरी बॉम्ब ब्लास्टप्रकरणी यासीन भटकळ दोषी

Subscribe

१३ फेब्रुवारीला जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये १७ जाणांचा मृत्यू तर ५७ जण जखमी झाले होते.

पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० ला झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी यासीन भटकळविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. १५ जूनला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

१३ फेब्रुवारीला जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये १७ जाणांचा मृत्यू तर ५७ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाप्रकरणी तपासणीत सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला गेला. यात यासीन भटकळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यासीन भटकळ याला ऑगस्ट २०१३ मध्ये नेपाळच्या सीमेवर अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पुण्यातील न्यायालयात खटला सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी या खटल्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयात केली आहे.

- Advertisement -
जर्मन बेकरी

यासीन भटकळला सुनावणीदरम्यान विचारले की, तुझ्यावरील आरोपांबाबत तुझे म्हणणे काय. यावर भटकळ म्हणाला, ‘माझ्यावर असलेले अरोप निराधार आहेत. मी निर्दोष आहे.’

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी व्हावे असे त्या अर्जात म्हटले आहे. मात्र यासिन भटकळच्या वकिलाने विरोध दर्शवला आहे. आता यावर १५ जून रोजी सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -