पुण्यात अपघातांची मालिका थांबेना! शिवशाही बस आणि कंटेनरच्या धडकेत 1 ठार, 6 जखमी

pune accident speeding shivshahi bus hits container truck in saswad one died on the spot 6 injured

पुणे :  पुण्यात रस्ते अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. रविवारी एसटी महामंडळाची शिवशाही बस आणि कंटेनरच्या भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात कंटेनर चालकांचा मृत्यू झाला असून पाच ते सहा प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींना प्राथमिक उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवशाही बस आणि कंटेनरमधील ही धडक इतकी जोरदार होती की यात दोन्ही वाहनांच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. रविवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

पुणे सासवड रस्त्यावरील उरूळी देवाची गावालगत रविवारी रात्री 12.30 च्या दरम्यान हा अपघात झाला. यावेळी उरुळी देवाची फाट्याजवळ असलेल्या एका गोडाऊनमधून एक कंटेनर सासवडहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. नेमकं याचवेळी पुण्याच्या दिशेने येत एका शिवशाही बस येत होती. यावेळी कंटेरन बसच्या समोर आला यामुळे शिवशाही बस आणि कंटनेरमध्ये जोरदार धडक झाली. ज्यात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर शिवशाही बस चालक आणि बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान सर्व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

या अपघातानंतर संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी क्रेनच्या सहाय्याने अपघाग्रस्त शिवशाही आणि कंटेनरला रस्त्यांच्या बाजूला करण्यात आले, उरुळी देवाची फाट्याजवळ वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर अपघातग्रस्त बस आणि कंटेनर हटवल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.


हेही वाचा : राज्यातील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आज निकाल; 608 पैकी 51 ग्रामपंचायती बिनविरोध