पुणे- अहमदनगर महामार्गावर कारचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

अपघातानंतर ट्रक चालक आणि त्याचा सहकाऱ्यांना घटनास्थळावरून पळ काढला आहे. मात्र संबंधित ट्रक पोलिसांनी ताब्यात घेत त्यांचा शोध सुरु केला आहे

pune ahmednagar highway accident five people death

पुणे : महाराष्ट्रातील महामार्गांवर भीषण अपघाताची मालिका सुरु आहे. यात पुणे – अहमदनगर महामार्गावरही आज भीषण अपघात झाला आहे. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उलट्या दिशेने आलेल्या ट्रकला कारने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. पुणे येथील रांजणगाव एमआयडीसीतील एलजी कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला आहे. मृत्यू झालेले सर्व प्रवासी पनवेलला जाण्यासाठी निघाले होते.

अपघातग्रस्त इको कार रात्री दोन वाजता नगरहून पुण्याच्या दिशेने जात होती. यावेळी एक ट्रक रस्त्याच्या उलट्या दिशेने येत होता. याचदरम्यान ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रात्री 2 वाजता घडला. अपघातात पूर्णपणे चुक ही ट्रक चालकाची होती. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त प्रवासी हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. लग्न समारंभासाठी ते नगरला गेले होते. लग्नसोहळ्यानंतर ते नगरहून पनवेलला येत होते. सर्व प्रवासी हे पनवेलचे रहिवासी होते. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. ज्यांचे वय ४ ते ७ दरम्यान आहे.

अपघातानंतर ट्रक चालक आणि त्याचा सहकाऱ्यांना घटनास्थळावरून पळ काढला आहे. मात्र संबंधित ट्रक पोलिसांनी ताब्यात घेत त्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांच्या मते या अपघातात पूर्णपणे चुक ही ट्रक चालकाची आहे. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या समोरच्या बाजूचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.


गोंदियात रेल्वेचा भीषण अपघात, एक डब्बा घसरल्याने 50 हून अधिक प्रवासी जखमी