घरताज्या घडामोडीPune Airport Close in October: ऑक्टोबर महिन्यात १४ दिवस बंद राहणार पुणे...

Pune Airport Close in October: ऑक्टोबर महिन्यात १४ दिवस बंद राहणार पुणे विमानतळ, काय आहे कारण?

Subscribe

ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट बुकींग केले होते त्यांना मात्र आता तिकीट रद्द करावे लागणार

ऑक्टोबर महिन्यात पुण्याला (Pune airport) जाण्यासाठी विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात पुणे विमानतळ सलग १४ दिवस बंद असणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे विमानतळ १६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत बंद राहाणार आहे. (Pune airport will be closed for 14 days in October)  पिटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळवरुन सुरू होणारी सर्व कमर्शिअल उड्डाणे या दिवसात बंद राहतील. पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाकडून रनवेचे काम केले जाणार आहे. पुणे विमानतळच्या अधिकाऱ्यांनी हवाई दलाकडून सुचना मिळाल्यानंतर १४ दिवस विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे विमानतळाच्या ट्विटवर ट्विट करत सर्व प्रवाशांना याविषयी माहिती देण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार रनवेच्या पुनरुत्थानाच्या कामामुळे पुणे विमानतळावरुन चालणारी उड्डाणे १६ ऑक्टोबर २०२१ ते २९ ऑक्टोबर २०२१पर्यंत चालणार नाही,असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

पुणे विमानतळाकडून ही घोषणा करण्यात आल्यानंतर प्रवाशांमध्ये नाराजी दिसून आली. मुंबईहून पुण्याला जाणारे किंवा पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट बुकींग केले होते त्यांना मात्र आता तिकीट रद्द करावे लागणार आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील विमान उड्डाणे बंद करण्यात आली होती त्यावेळेसही अनेकांची तिकीटे रद्द करावी लागली होती.

- Advertisement -

भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या १४ दिवसांच्या कालावधीत पुणे विमानतळावरील रनवेचे रिसरफेसिंग केले जाणार आहे. खरंतर हे काम एप्रिल महिन्यात केले जाणार होते. मात्र काही कारणांमुळे हे काम स्थगित करण्यात आले होते. पुणे विमानतळाचे संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळाच्या रनवेच्या मेंटनन्सचे काम जवळपास १० वर्षांनी होणार आहे.

 


हेही वाचा – Chipi Airport : चिपी एअरपोर्टच्या भूसंपादनात एकरी फक्त ६०० रूपयांचा भाव

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -