घरताज्या घडामोडीPune Ambil Odha: आंबिल ओढा अतिक्रमण प्रकरण, तोडकामाला न्यायालयाकडून स्थगिती

Pune Ambil Odha: आंबिल ओढा अतिक्रमण प्रकरण, तोडकामाला न्यायालयाकडून स्थगिती

Subscribe

पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे प्रकरण आज सकाळापासून चांगलेच पेटल्याचे दिसले. पण अखेर न्यायालयाकडून आंबिल ओढा कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत न्यायालयाने महापालिकेला आदेश दिला असून महापालिकेने तात्काळ कारवाई थांबवली आहे. यामुळे आंबिल ओढा परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच नागरिकांनी जेसीबी परिसरातून परतत असताना एकच जल्लोष केला आहे.

आज, गुरुवारी सकाळी अचानक आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी कारवाईला स्थानिक नागरिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. इतकेच नाहीतर काही नागरिकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. एवढे सगळे होऊनही घरांवर जेसीबी चढवला गेला. पण न्यायालयाकडून तोडक कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. सगळी परिस्थिती न्यायालयात वकिलांनी स्थानिकांच्या बाजूने मांडल्यानंतर तोडक कारवाईला स्थगिती दिली आहे.

- Advertisement -

न्यायालय म्हणाले की, जे लोकं विस्थापित होणार आहेत, त्यांचे पुनर्वसन करण्याचा रेकॉर्ड न्यायालयासमोर नाही आहे. त्यामुळे लोकांना अशाप्रकारे उद्ध्वस्त करणे उचित ठरणार नाही. म्हणून जोपर्यंत लोकांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत महापालिकेच्या तोडकामाच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही स्थगिती कायम असणार आहे.

माहितीनुसार, १३४ घरांवरती कारवाई करायची होती. इथल्या नागरिकांचे राजेंद्र नगरमधील स्कीममध्ये स्थलांतर करण्यात आले. काही लोकांना ८व्या आणि ९व्या मजल्यावर घरे देण्यात आली होती. दरम्यान नागरिकांकडून यासाठी विरोध केला जातोय की, नागरिकांना कुठलीही हमी दिली नाही आहे. किती दिवसांत कायमी स्वरुपी पुनर्वसन केले जाणार, याबाबत लेखी माहिती दिली नाही आहे. असे असताना भर पावसाळ्यात आणि कोरोनाच्या परिस्थितीत बेघर केले. त्यामुळे स्थानिक नागरिक आक्रमक झाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

हेही वाचा  – Pune Ambil Odha: याप्रकरणाशी पुणे महापालिकेचा संबंध नाही; महापौरांनी झटकले हात


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -