घरमहाराष्ट्रपुणेपुण्यात अपघातांचे सत्र सुरूच, ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक

पुण्यात अपघातांचे सत्र सुरूच, ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक

Subscribe

गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे-बंगळूरू हायवेवर नवले पुलाजवळील विचित्र अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा याच महामार्गावरील दरी पुलावर आज चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे-बंगळूरू हायवेवर नवले पुलाजवळील विचित्र अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा याच महामार्गावरील दरी पुलावर आज (ता. 11 नोव्हेंबर) चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने खासगी लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक दिल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातानंतर पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी आणि दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Pune-Bangalore highway, a container whose brakes failed collided with vehicles)

हेही वाचा – “तुमचं विमान वेळेवर टेक ऑफ झालं नसतं तर…”, एकनाथ खडसेंनी मानले मुख्यमंत्री शिंदेंचे आभार

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता. याचवेळी या कंटेनरने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यानंतर डिव्हायडर तोडून समोरच्या लेनवर पलटी झाला. यावेळी समोरच्या लेनवरुन सातारच्या दिशेने निघालेल्या लक्झरी बसला देखील या कंटेनरची धडक बसली. ज्यानंतर या बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन तत्काळ बचावकार्याला सुरुवात केली. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने वाहने हटवून काही वेळातच या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. पण या अपघातामुळे पुण्यातील अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाहनांचा वेग आणि ब्रेक फेल होऊन अपघात होण्याच्या प्रमाणात मागील काही दिवसांत वाढ झाल्याने पुणेकरांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यांत 63 ब्लॅक स्पॉट असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यातही पुणे येथील नवले पूल आणि पुणे नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. 2020 नंतर पुणे शहरातील अपघाताचे प्रमाण 113 टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात अपघातांचे ब्लॅकस्पॉट शोधण्यासाठी समिती तयार करण्यात आली होती. या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि परिवहन विभागाचे अधिकारी होते. त्यांनी पुण्यात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या ठिकाणांची पाहणी करून या ब्लॅक स्पॉट संदर्भातील माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -