घरताज्या घडामोडीMaharashtra Flood : अखेर पुणे - बंगळुरू हायवे वाहतूकीसाठी खुला

Maharashtra Flood : अखेर पुणे – बंगळुरू हायवे वाहतूकीसाठी खुला

Subscribe

अतिवृष्टी आणि पूराच्या पाण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला पुणे बंगळुरू NH-4 हायवे अखेर सुरू झाला आहे. कोल्हापूर पोलिसांनी याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. या मार्गावर सकाळच्या सत्रात अत्यावश्यक अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती. सध्या पुराचे पाणी कमी झाल्याने सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांची वाहतूक एकेरी मार्गाने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलेली आहे. कोल्हापूरच्या कागल नजीक ही वाहतूक सुरक्षिततेचा उपाय म्हणून रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील वाहनांना कर्नाटकात प्रवेश बंदी करण्यात आली होती. कर्नाटकातूनही महाराष्ट्रात प्रवेशासाठी मज्जाव करण्यात आला होता. पण अनेक दिवसांनंतर अखेर याठिकाणी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पाणी ओसरल्यानेच ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

कोल्हापूर तसेच बेळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही भाग पाण्याखील गेल्याने मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून कोल्हापूर पोलिसांनी या महामार्गावरील वाहतूक थांबवली होती. परिणामी महाराष्ट्रातून बंगळुरूच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली. कोल्हापूरात पंचगंगेने धोक्याची पातळी गाठल्याने कोल्हापूरात अनेक ठिकाणी पूराची परिस्थिती होती. त्यामुळे कोल्हापूरच्या कागलपासून पुढे जाणारी वाहतूक पोलिसांनी रोखून धरली होती. याठिकाणी पाण्याची वाढलेली पातळी पाहूनच ही वाहतूक पोलिसांकडून रोखून धरण्यात आली होती. कर्नाटकच्या दिशेने जाणारी संपुर्ण वाहतूक थांबवण्यात आली होती.

- Advertisement -

कोल्हापूरच्या कागलच्या पुढे काही भाग हा पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळेच कोल्हापूरापासून पुढे जाणारी वाहतूक थांबवली होती. पंचगंगा नदीची वाढणारी पातळी पाहता या दिशेने जाणारी वाहतूक थांबवण्यात आली होती. पंचगंगेने सकाळीच ४३ फुटाची पातळी गाठली होती. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरातील अनेक गावाचा संपर्क तुटला होता. या वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे कुटूंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -