Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र एकनाथ खडसेंच्या जावयाची ईडी कोठडी १९ जुलैपर्यंत वाढली

एकनाथ खडसेंच्या जावयाची ईडी कोठडी १९ जुलैपर्यंत वाढली

Related Story

- Advertisement -

पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची ईडी कोठडी १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील चार दिवस त्यांना ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे. भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहारात गिरीश चौधरी यांचा थेट संबंध असल्याचे आरोप करत ईडीने पुढील तपास करण्यासाठी कोर्टाकडे कोठडी वाढवून द्या अशी मागणी केली होती. ही मागणी आज सुनावणीदरम्यान कोर्टाने मान्य करत गिरीश चौधरी यांची ईडी कोठडी १९ जुलैपर्यंत वाढवली आहे.

गिरीश चौधरी यांना ५ जुलैला ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते ईडीच्या कोठडीत आहेत. तेव्हापासून ३ वेळी चौधरी यांच्या ईडी कोठडीत वाढत करण्यात आली आहे. या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची मुलगी शारदा यांची देखील ईडीने चौकशी केली आहे.

- Advertisement -

जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर ईडीने एकनाथ खडसे यांनाही समन्स बजावला होता. यानंतर एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ८ तास एकनाथ खडसे यांनी चौकशी केली. यानंतरही गरज लागल्यास चौकशीला हजर राहावे लागणार असे ईडीने स्पष्ट केले. मात्र आज पुन्हा जावई गिरीश चौधरी यांची ईडी कोठडी वाढवल्यामुळे खडसेंच्या अडचणींत अधिक वाढ झाली आहे. खडसेंनी दिलेल्या माहितीच्या आधारे आता ईडी चौधरी यांची उलटतपासणी घेणार असल्याची माहिती समोर येणार आहे. यामुळेच गिरीश चौधरी यांची ईडी कोठडी चार दिवसांसाठी वाढवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री पदावर असणाऱ्या एकनाथ खडसे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करत पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. मात्र खडसे यांनी पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे हा भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं. यामुळे खडसे यांनी या प्रकरणात गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला असून त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.


…आणि ६३०० फूट उंच कड्यावरून झोका घेताना पाळण्याची दोरीच तुटली


- Advertisement -

 

- Advertisement -