घर महाराष्ट्र गोळी लागल्याने भाजप नगरसेवक जखमी

गोळी लागल्याने भाजप नगरसेवक जखमी

Subscribe

भाजपचे नगरसेवक गणेस बिडकर पिस्तुल साफ करत होते. त्याच दरम्यान चुकून पिस्तुलमधून गोळी सुटली आणि ती गोळी त्यांच्या मांडीमध्ये घुसली

पुण्यामध्ये भाजप नगरसेवकाला गोळी लागल्याची घटना घडली आहे. भाजपचे स्विकृत नगरसेवक गणेस बिडकर गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. आज दुपारी गणेश बिडकर त्यांची पिस्तुल साफ करत होते. त्या दरम्यान चुकून पिस्तुलमधून गोळी सुटली आणि त्यांच्या पायाला गोळी लागली. सुरुवाताली त्यांच्यावर गोळीबार केल्याची अफवा पसरली होती मात्र काही वेळातच पिस्तुल साफ करताना गोळी लागल्याचे स्पष्ट झाले. त्यांना उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे नगरसेवक गणेश बिडकर पिस्तुल साफ करत होते. त्याच दरम्यान चुकून पिस्तुलमधून गोळी सुटली आणि ती गोळी त्यांच्या मांडीमध्ये घुसली. गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना ताबडतोब रुबी हॉल रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून तपास सुरु आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -