चिंचवड पोटनिवडणूक : ८ EVM मशिनमध्ये तांत्रिक बिघाड; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक आज होत आहे. रविवारी सकाळपासून कसबा आणि चिंचवडमध्ये मतदानाला सुरूवात झाली. ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. असे असताना चिंचवड मतदारसंघातील ८ इव्हीएम मशीन तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक आज होत आहे. रविवारी सकाळपासून कसबा आणि चिंचवडमध्ये मतदानाला सुरूवात झाली. ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. असे असताना चिंचवड मतदारसंघातील ८ इव्हीएम मशीन तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याची माहिती समोर येत आहे. मशीन बंद पडल्याने काही काळासाठी मतदान थांबवण्यात आले होते. दरम्यान, निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या टीमने इव्हिएम मशिन बदलल्यानंतर येथील मतदान सुरुळीत झाले.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत अमुक्रमे १४.५ आणि १३.७५ टक्के मंतदानाची नोंद झाली. मतदानाच्या सुरू झाल्यानंतर काही तासांतच उमेदवारांनीही आपले मत नोंदवली. भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केलेली पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळ पासून मतदानाला सुरवात झाली आहे.

आज सकाळी सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेत तब्बल १३ मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया थांबली होती. चिंचवड येथे मतदान सुरू असतांना ८ मशीन बंद पडल्या आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे भवितव्य हे मतपेटीत बंद होणार आहे. या निवडणुकीत कसबा मतदार संघातून भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेस तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे निवडणूक रिंगणात आहेत. तर चिंचवड मतदार संघात आश्विनी जगताप या भाजपच्या उमेदवार तर नाना काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर बंडखोर राहुल कलाटे हे देखील या निवडणूक रिंगणात उभे आहेत.

राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे वादात

मतदान प्रक्रिया पार पडत असताना अनेक नियमांचं पालन केलं जातं. मतदान करायला जाताना मतदान केंद्रावर मोबाईल, कॅमेरा वापरावर निर्बंध असतात. कोणत्याच मतदाराला येथे मोबाईल घेऊन जाता येत नाही. यासाठी मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली असते. मात्र, असे असतानाही राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मतदान करतानाचा फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.


हेही वाचा – दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा काश्मिरी पंडित टार्गेटवर; पुलवामातील गोळीबारात एकाचा मृत्यू