घर महाराष्ट्र पुणे Pune Chandani Chowk : एकीकडे फेसबूक पोस्ट तर दुसरीकडे कार्यक्रमाला हजेरी, मेधा...

Pune Chandani Chowk : एकीकडे फेसबूक पोस्ट तर दुसरीकडे कार्यक्रमाला हजेरी, मेधा कुलकर्णी चर्चेत

Subscribe

चांदणी चौक पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमपत्रिकेत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नाव नसल्याने त्यांनी नाराजी दर्शविली. पण आज त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने त्यांची नाराजी दूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे : पुण्यातील बहुचर्चित अशा चांदणी चौकच्या पुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पण हा पुल चर्चेत आला तो भाजपमधील नाराजी नाट्यामुळे. कारण या पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत कोथरुड विधानसभेच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नाव लिहिण्यात आल्याने त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. कशा पद्धतीने पक्षाकडून त्यांना डावलण्यात आले आहे, याबाबतची आधी ट्विटरवर पोस्ट आणि त्यानंतर फेसबूकवर पोस्ट करत मेधा कुलकर्णी यांनी आपली नाराजी उघडपणे दाखवून दिली. (Pune Chandani Chowk: Angry Medha Kulkarni attended the event)

हेही वाचा – ‘कोल्ड वॉर वैगरे असे काही नाही, मी अडीच वर्षे…’, मंत्रालयातील आढावा बैठकीबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण

- Advertisement -

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत होते. पण त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत नेमके त्यांचे काय सुरू आहे, असा प्रश्न सर्वांच्याच समोर उपस्थित केला आहे. मेधा कुलकर्णी यांनी काल ‘निराश’ असे पोस्ट केले होते. ज्यानंतर भाजपमधील हा अंतर्गत वाद समोर आला होता. तर त्यानंतर कुलकर्णी यांनी फेसबूकला भलीमोठी पोस्ट करत कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. परंतु त्यांनी आता अचानक या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

मेधा कुलकर्णींची फेसबूक पोस्ट…

” असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे” असे सुरुवातीला लिहित मेधा कुलकर्णी यांनी लिहिले आहे की, “माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी.
चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय Nitin Gadkari जी आणि Devendra Fadnavis यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”. अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही.
साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.
देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.”

तर याचा मी अर्थ मी नको आहे…

मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या फेसबूकपोस्टमधून त्यांना गेल्या काही वर्षांपासून कशा प्रकारे डावलले जात आहे, याबाबतची माहिती दिली आहे. तर या पुलासाठीचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा उपस्थित केला होता. असे सांगत त्यांनी नितीन गडकरींनी केलेल्या एका वक्तव्याची आठवण करून दिली. तर गेल्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात आले होते, तेव्हा देखील मेधा कुलकर्णी यांच्यावर कशा प्रकारे अन्याय झाला, याबाबत देखील त्यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमधून सांगितले.

- Advertisement -

नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांनी एका कोपऱ्यात बसणे पसंत केले. एकीकडे भाजपचे सर्व आमदार आणि मंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत करण्यासाठी बाहेर उभे असताना मेधा कुलकर्णी या चंद्रकांत पाटील यांच्याशी न बोलता सभा मंडपात निघून गेल्या. त्यामुळे चांदणी चौक पुलाच्या उद्घाटनापेक्षा मेधा कुलकर्णी या कालपासून सर्वाधिक चर्चेत असल्याच्या पाहायला मिळत आहेत.

- Advertisment -