पुण्याच्या चितळे बंधूंकडे २० लाखांच्या खंडणीची मागणी, सापळा रचून आरोपींना अटक

चितळेंच्या दुधामध्ये एक काळा पदार्थ आढळल्याची  तक्रार ग्राहक निर्वाचन आयोगाकडे केली होती.

Pune Chitale brothers demand Rs 20 lakh ransom, accused arrested by setting a trap
पुण्याच्या चितळे बंधूंकडे २० लाखांच्या खंडणीची मागणी, सापळा रचून आरोपींना अटक

केवळ पुणेच नाहीतर संपूणी जगभरात बाकरवडींसाठी प्रसिद्ध असलेल्या चितळे बंधूं मिठाईवाल्यांना २० लाखांच्या खंडणीची मागणी करुन धमकावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ( Pune Chitale brothers demand Rs 20 lakh ransom) या प्रकरणी पुण्याच्या बिबडेवाडी पोलिसांनी  कारवाई करुन चितळे बंधूंना खंडणीसाठी धमकावणाऱ्या त्रिकुटाला सापळा रचून अटक केली आहे. ( accused arrested by setting a trap) चितळे बंधूंना खंडणीसाठी धमकावणाऱ्या तीन जणांमध्ये एका महिला शिक्षिकेचा देखील समावेश असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.  पुण्यात चितळे बंधू मिठाईवाल्यांची बाकरवडी जगभरात प्रसिद्ध आहेत. परंतु पुण्यात चितळे बंधूंच्या दुधाला देखील प्रचंड मागणी असते. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींनी चितळेंच्या दुधामध्ये एक काळा पदार्थ आढळल्याची  तक्रार ग्राहक निर्वाचन आयोगाकडे केली होती. त्यानंतर या आरोपींनी चितळे बंधूंशी संपर्क साधून २० लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर चितळे बंधूंचे व्यवस्थापक नामदेव पवार यांनी या संबंधात गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली.

सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात

चितळे बंधूंकडे २० लाखांच्या खंडणीची मागणी करुन त्यांना धमकवण्यात येत असल्याची तक्रार गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी चितळे बंधूंशी संपर्क साधून सिनेमातील घटनेप्रमाणे आरोपींना पकडण्यासाठी सापळा तयार केला. २० लाखांच्या खोट्या नोटांची बंडले तयार केली. त्यानंतर चितळेंचे व्यवस्था खंडणीसाठी बोलावलेल्या ठिकाणी खोट्या नोटांची बंडले असलेली बॅग घेऊन त्या लोकेशनवर पोहचले. पोलिसांनी योग्य सापळा लावून खंडणी घेण्यासाठी आलेल्या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांमध्ये एका महिलेचा शिक्षिकेचा समावेश असल्याचे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले. महिलेसोबत तिचे वडिल आणि बहिणीचा समावेश होती.  ही महिला शिक्षिका एक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुण्याच्या बिबडेवाडी पोलिसांनी तिन्ही आरोपींनी ताब्यात घेऊन त्यांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


हेही वाचा – मुंबई अद्यापही तिसऱ्या स्तरात मध्येच महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची माहिती