घरताज्या घडामोडीPune : पुण्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता आता पहिली ते आठवीचे वर्ग फुल...

Pune : पुण्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता आता पहिली ते आठवीचे वर्ग फुल डे भरणार – अजित पवार

Subscribe

पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु झाली आहे. त्यावेळेस शाळा हाफ डे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुण्यात पहिली ते आठवी शाळा पूर्ण वेळ शाळा सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु झाली आहे. त्यावेळेस शाळा हाफ डे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुण्यात पहिली ते आठवीपर्यंत शाळा पूर्ण वेळ सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. सध्या जागतिक परिस्थिती पाहता नवीन रुग्णसंख्येमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे. परंतु दैनंदिन कोविड मृत्यूसंख्येत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजची कोरोनाची परिस्थिती पाहता आपल्या जिल्ह्यात आणि राज्यात आणि जगात हिच परिस्थिती आहे. यावर टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. कदम म्हणाले की, या परिस्थितीमागे काय कारण आहे हे आम्हीसुद्धी शोधतोय कारण गेले काही दिवस रुग्णसंख्येत वाढ नाही मात्र कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या जास्त आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर राज्यातही नियम शिथील करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कोरोना आढावाच्या बैठकीदरम्यान पुणे महानगरपालिकेच्या महापौर यांची तब्ब्येत ठीक नसल्यामुळे अनुपस्थित होते मात्र, आमदार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रुग्णसंख्या कमी तरी घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणार नाही

फ्रान्स, अमेरिका या देशात नवीन रुग्णसंख्येत घट झाली आहे तर,जर्मनी आणि युनायटेड किंगडमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मात्र आपल्या देशाबाबत सांगायचे झाले तर, एकंदरीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत ३० टक्के घट आपल्या देशपातळीवर तर राज्यात ४२ टक्के घट पुणे जिल्ह्याची घट ५० टक्के इतकी झाली आहे. पुण्यातील रुग्णसंख्येत घट झाली असली तरी घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणार नाही, असे अजित पवार यांनी सांगतले.

- Advertisement -

५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लस उपलब्ध करून देणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले, अशी माहिती अजित पवारांनी दिली. लसीची कमतरता पडणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच कोरोना निर्बंध लावण्याचे अधिकार जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुण्यातील जम्बो हॉस्पिटल बद्दल २८ फेब्रुवारीपर्यंत विचार करू आणि मार्च मध्ये निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितलं. मागील आठवड्याच्या तुलनेत कोविडचे लसीकरणसुद्धा आपण १ लाख ३३ हजार इतके केले आहे. अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुण्यातील स्लॅब दुर्घटनेप्रकरणी नातेवाईकांना मदत जाहीर

पुण्यातील येरवड्यातील शास्त्रीनगर भागात शुक्रवारी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 5 मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे.

किरीट सोमय्यांच्या आरोपांबाबत स्पष्ट भूमिका

किरीट सोमय्यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरबाबत काही दिवसांपूर्वी आरोप केले होते. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोविड सेंटर्सच्या व्यवस्थेमध्ये सुरुवातीपासूनच पारदर्शकता ठेवली आहे. कुठेही चूकीचे काही होणार नाही याबाबत सूचना दिल्या आहेत. यावर जर कोणाचे काही म्हणणे असेल तर, त्याबाबत पुरावे द्या,मग त्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करू”, अशी भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या वाईनवरील आरोप-प्रत्यारोपांमध्ये रस नसल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

 


हे ही वाचा – शेण खायचं स्वत: आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा, सोमय्यांच्या आरोपांवर संजय राऊतांचे प्रतिउत्तर


 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -