औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराचा अचानक मृत्यू, कोरोना चाचणी केली पण…

मृत्यूनंतर या कामागाराचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते.

Coronavirus, covid19 symptoms, coronavirus fatality, icmr issued guidance, covid19 deaths, icmr corona guideline, deaths due to corona, corona deaths data, India News in Hindi, Latest India News Update, ICMR issued New criteria for covid 19 deaths, आयसीएमआर, राष्ट्रीय विषाणूविज्ञान परिषद, नव्या गाईडलाईन्स
कोरोना मृत्यू आकडेवारी ठरविण्यासाठी नवीन निकष, ICMR चा मोठा निर्णय !

पुण्यात कोरोनाचा प्रसार वाढत असताना पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव व चाकण औद्योगिक वसाहतीत आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कामगाराचा कोरोनाने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका मोठ्या कंपनीत हा कामगार पुण्याच्या हडपसर भागातून कामासाठी येत होता. परंतू कामागरांचा अचानक मृत्यू झाला.

मृत्यूनंतर या कामागाराचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. असा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या कामगाराला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कामगाराच्या मृत्यूनंतर रांजणगाव औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या कामागारांच्या ५० कामगारांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी इथे एका प्रसिद्ध आणि बड्या कंपनीतील कामागाराला कोरोनाची लागण झाली आहे. या कामगाराला पिंपरी चिंचवडमधील एका रूग्नालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे या कामगाराच्या संपर्कातील कामगारांनाही प्रशासनानं आता क्वॉरंटाईन केलं आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या ६ हजार ८७९ झाली असून दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता निम्म्यावर आली आहे. आतापर्यंत पुण्यात ३ हजार ६६१ जण कोरोनामुक्त होऊन बरे झाले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली आहे. अॅक्टीव्ह रुग्णसंख्या २ हजार ९१२ असून पुणे जिल्हयात एकूण ३०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १८० रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली असल्याचेही त्यांनी सांगितले. गुरुवारी पुणे शहरात ३१८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर २०५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर दिवसभरात १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हे ही वाचा – परदेशातून आल्यानंतर दोन महिन्यांनतर दिसली कोरोनाची लक्षणं, डॉक्टरही हैराण!