कोरोना पाठोपाठ पुण्यावर पाणीटंचाईचे संकट – अजित पवार

deputy cheif minister ajit pawar reation on wine selling in super market in Maharashtra
'वाईन आणि दारूमध्ये जमीन-अस्मानाचा फरक; विरोधक लोकांमध्ये पसरवतायत गैरसमज'

पुणे जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही आहे. त्यामुळे पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील नियम कायम असणार आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितली. आज अजित पवार यांनी बाणेरमधील हॉस्पिटलची पाहणी केली आणि पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी कोरोना पाठोपाठ पुण्यात पाणीटंचाईची काळजी असल्याचे सांगितले.

‘हवामान खात्याचा अंदाज फोल, पावसाचा नाही जोर’ 

पुण्यातील पाणीटंचाईबाबत अजित पवार म्हणाले की, ‘पुण्यातील पाण्याची परिस्थिती पाहायला गेली तर, जूनमध्ये तुलनात्मक पाऊस बरा झाला. नेहमी जसा जुलैमध्ये पाऊस पडतो तसा पाऊस झाला नाही आहे. आपल्याकडे अजूनही ३०, ३१ टक्के पाण्याचा साठा आहे. पाऊस लवकर आला पाहिजे. हवामान खात्याकडून रेड, ऑरेज अलर्ट देण्यात आला होता. पण तसा काही एवढा जोर पावसाने दाखवला नाही आहे. काही ठिकाणी पावसामुळे पिकांना मदत नाही झाली असं नाही. अजून धरण भरल्याशिवाय वर्षभर दिलासा मिळणार नाही आहे. याबाबत काळजीमध्ये आहोत.’

पुण्यातील कोरोना अपडेट 

पुढे अजित पवार म्हणाले, ‘राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण पुणे जिल्ह्यात आहे. लोकसंख्या जास्त आहे, ही वेगळी बाब आहे. पण आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणाचा वेग आणखीन वाढवण्याची गरज आहे. राज्याच्या कोरोना मृत्यूदर २.४ टक्के असून पुण्याचा १.६ टक्के मृत्यूदर आहे. तर साप्ताहिक पॉझिटिव्ह दर ५.६ टक्के असून सध्याचा ४.३६ टक्के आहे. पुण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३० टक्के आहे, तर राज्यात ९६.३० टक्के आहे.’


हेही वाचा – टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि लस ही रणनीती प्रत्येक राज्यानं राबवायला हवी – पंतप्रधान मोदी