पुण्यात कोरोनाचे थैमान! धुळवड साजरी करण्यास येणाऱ्या पर्यटकांवर निर्बंध

लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळी येणाऱ्यांवर निर्बंध

pune corona update Restrictions on tourists visiting Lonavla and Maval
पुण्यात कोरोनाचे थैमान! धुळवड साजरी करण्यास येणाऱ्या पर्यटकांवर निर्बंध

पुण्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळावर निर्बंध लादण्यात आले आहेत. जिल्ह्यामधील ग्रामीण कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक ठिकाणावरील हॉटेल, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृह, खासगी मोकळ्या जागेवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे होळी आणि धुळवड साजरी करायला बंदी घातली असून पर्यटकांवर देखील निर्बंध लादण्यात आले आहेत.

होळी आणि धुळवडला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यात कोरोनाबाधितांची संख्या ही झपाट्याने वाढ आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी होळी आणि धुळवड साजरी न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यादिवशी पर्यटक पुण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळावर येण्याचा जास्त शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन पर्यटनावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे होळी आणि धुळवड दिवशी पर्यटकांनी जर काही पुणे लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळावर जाण्याचा प्लॅन करायचा असेल तर ही बाब लक्षात घ्यावी लागले. नाहीतर त्या पर्यटकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

पुण्यात काल (मंगळवारी) ३ हजार ९८ नवे कोरोनाबाधित आढळले असून २२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच १ हजार ६९८ जण रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. काल ११ हजार ३१० कोरोना चाचण्या झाल्या आहे. पुणे पालिकेच्या माहितीनुसार, पुण्याता आता कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ४० हजार ८३४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५ हजार ९० जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ११ हजार ३०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २४ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Coronavirus Vaccination: ४५ वर्षांवरील सर्वांना लस मिळणार; लसीकरणासाठी अशी करा नोंदणी