घरट्रेंडिंगते आले... अन् पुन्हा एकदा झाला थाळीनाद, टाळ्यांचा कडकडाट

ते आले… अन् पुन्हा एकदा झाला थाळीनाद, टाळ्यांचा कडकडाट

Subscribe

पुण्यातल्या सोसायटीच्या दारावर एम्ब्युलन्स आली, ३५० फ्लॅट्च्या सोसायटीमध्ये सगळेच जण आपआपल्या बाल्कनीतून डोकावत होते. ते जोडप गाडीतून उतरले आणि कॉम्प्लेक्समध्ये येऊ लागले, तोच सगळ्यांनी एकच जल्लोष केला, पुन्हा एकदा थाळी नाद करून आणि टाळ्यांच्या कडकडाट करत. हे सगळ सेलिब्रेशनही स्पेशलच होत. सेलिब्रेशनच कारण होत ते म्हणजे महाराष्ट्रातील पहिल करोनाची लागण झालेले जोडप महाराष्ट्रात परतल होत. हॉस्पिटलमध्ये करोनाची लागण झाल्यानंतर आपले उपचार पुर्ण करत हे जोडप आज पुण्यात परतल होते. सोसायटीमध्ये प्रवेश करताच लोकांनी आपआपल्या घरातूनच त्यांचे जोरदार स्वागत केले.

जोडप्याने नायडू हॉस्पिटलमध्ये गेले काही दिवस उपचार घेतले होते. सतत दोन वेळा त्यांची करोनाची चाचणी निगेटीव्ह आल्यानेच त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. करोनाच्या उपचारासाठी आयसोलेशनचा १४ दिवसांचा कालावधी पुर्ण केल्यानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले. सोसायटीमधील लोकांनी केलेल्या स्वागतामुळे या जोडप्यालाही खूप समाधान वाटले. सोसायटीतील कोणतीही व्यक्ती त्यांच्या स्वागतासाठी समोर आली नाही. पण सोसायटीमधील सगळ्यांनी आपआपल्या परीनेच घरातूनच त्यांचे स्वागत केले. सोसायटीनेच कोणालाही या जोडप्याला प्रत्यक्ष भेटू नका असे बजावले होते. पण लोकांनी आपआपल्या बाल्कनीमधून थाळीनाद करत आणि टाळ्यांचा कडकडाट करत स्वागत केल्याने या जोडप्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळाला. हे जोडपे घरी पोहचताच अनेकांनी त्यांना फोन करून अभिनंदन करत त्यांचे स्वागत केले. आम्ही तुमच्या सोबतच आहोत असा आश्वासक सल्लाही या सोसायटीमधील सदस्य़ांनी या जोडप्याला दिला.

- Advertisement -

सोसायटीमधील काही सदस्यांनी आधीच त्यांच्या जीवनावश्यक गोष्टींची तरतूद करून ठेवली होती. जेणेकरून त्यांना पुन्हा कोणतीही अडचण येणार यासाठीची ही खबरदारी होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताच सोसायटीत पोहचण्याआधी जिल्हाधिकारी प्रशासनाकडून, डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी यांच्याकडूनही त्यांना फुलांचा गुच्छ देत शुभेच्छा देण्यात आल्या. एक ठराविक अंतर ठेवूनच हा सगळा कौतुकाचा कार्यक्रम पार पडला. दुबईहून परतलेल्या ४० जणांच्या टीमचा भाग हे असलेले हे जेष्ठ नागरिकांचे जोडपे त्यांच्या २३ वर्षीय मुलीसोबत मुंबईत परतले होते. मुंबई ते पुणे असा एका कॅबने त्यांनी प्रवास केला होता. त्यानंतर मुलीला आणि त्या कॅब ड्रायव्हरलाही करोनाची चाचणी पॉझिटीव्ह डिटेक्ट झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -