Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बनावट ग्राहक पाठवून रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यास ठोकल्या बेड्या, पुणे गुन्हे शाखेची धडक...

बनावट ग्राहक पाठवून रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यास ठोकल्या बेड्या, पुणे गुन्हे शाखेची धडक कारवाई

बड्या रुग्णालयाच्या नर्सलाही केली अटक

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरतो आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. रेमडेसिवीरच्या वाढत्या मागणीमुळे राज्यासह देशात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाच नफेखोरांनी फायदा घेत रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरु केला आहे. मुंबई, पुण्यात गुन्हे शाखेच्या कारवाईत अनेक काळाबाजार करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहेत. तसेच पुणे गुन्हे शाखेने एका बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचत रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यास बेड्या ठोकल्या आहेत.

पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रांचला मिळाली होती. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे चढ्या भावाने विक्रि होत आहे. पुणे गुन्हे शाखेने काळाबाज करणाऱ्या व्यक्तीस बेड्या ठोकण्यासाठी एका बनावट ग्राहकाच्या वतीने सापळा रचत तरुणाला अटक केली आहे. बनावट ग्राहकास या व्यक्तीने पाच हजाराचे रेमडेसिवीर इंजेक्शन सात हजार रुपयाला विकले आहे.

- Advertisement -

गुन्हे शाखेने अटक केलेल्या युवकाचे नाव पृथ्वीराज संदीप मुळीक (२२) असे नाव आहे. अधिक चौकशी करताना युवकाने एका बड्या रुग्णालयातील परिचारिकेने रेमडेसिवीर विकण्यासाठी दिले असल्याचे कबूल केले आहे. या माहितीच्या आधारे परिचारिकेला अटक केली असता चौकशीदरम्यान अनेकांची रेमडेसिवीरच्या काळाबाजार करण्यामागे नावे बाहेर आली आहेत. या प्रकरणाची व्याप्ती वाढत गेल्याने सखोल चौकशी करण्याची भूमिका पुणे गुन्हे शाखेने घेतली आहे.

- Advertisement -