पुणे : पुण्यात गुन्हेगारी थांबता थांबण्याचं नाव घेत नाही. एकप्रकारे पोलिसांचा गुन्हेगार आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये धाक नसल्याचं सातत्यानं दिसत आले आहे. बुधवारी एका व्यक्तीनं पत्नीचा गळ्यावर वार खून केल्याचा प्रकार ताजा आहे. यातच आता माजी उपमहापौराच्या मुलानं भर रस्त्यात एकाला मारहाण केली आहे. यानंतर माजी उपमहापौराच्या मुलानं सदर व्यक्तीला गोळी घालण्याची धमकी दिली. हद्द म्हणजे पोलिसांनी माजी उपमहापौराच्या मुलावर गुन्हा न दाखल करता फक्त ‘एनसी’ ( फक्त रजिस्टरमध्ये नोंद करणे ) दाखल केली.
पुण्याचे माजी उपमहापौर आणि काँग्रेसचे नेते, आबा बागुल यांचा मुलगा हेमंत बागुल यांनी एक नागरिकाला किरकोळ करणावरून मारहाण करत गोळी घालण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. फय्याज सय्यद, असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
हेही वाचा : ‘अरे वेड्या, फडणवीसांनी पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी वेळ मागितली, पण…’, कदमांनी ठाकरेंना फटकारलं
फय्याज सय्यद यांनी फिर्यादीत काय म्हटलं?
पुण्यातील मंगळवार पेठेतील जुना बाजार येथे एचपी पेट्रोल पंप आहे. पंपासमोर एक लाल रंगाची स्विफ्ट गाडी उभी होती. स्विफ्ट गाडी वाल्यानं अचानक दरवाजा उघडला. त्यामुळे माझ्या गाडी कोलमडून शेजारी असलेल्या काळ्या रंगाच्या ग्लोस्टर गाडीवर आदळली. त्यानंतर ग्लोस्टर गाडीतून हेमंत बागुल गाडीतून उतरले आणि माझ्या कानशिलात लगावली.
पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांचा मुलगा हेमंत बागुल यांच्याकडून दुचाकीस्वाराला मारहाण…#pune #punenews pic.twitter.com/MywPjCQ1tB
— My Mahanagar (@mymahanagar) January 24, 2025
मी तक्रार देण्यासाठी बंडगार्डन पोलीस ठाण्याकडे निघालो असताना, हेमंत बागुल यांनी दमदाटी केली. त्यासह गोळी घालण्याची धमकीही दिली. हेमंत बागुल यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे, असं सय्यद यांनी म्हटलं.
याबाबत हेमंत बागुल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी फक्त एनसी दाखल करून घेतली होती, असं फय्याज सय्यदचे मत आहे. मात्र, सय्यद यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेताच बागुल यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यासह हेमंत बागुल यांनीही बंडगार्डन पोलीस ठाण्यात फय्याज सय्यद विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा : सर्वसामान्यांना मोठी झळ! लालपरीचा प्रवास महागला, रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढ