घरक्राइमPune Crime News : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा ससून रुग्णालयातून...

Pune Crime News : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा ससून रुग्णालयातून पळाला; पोलीस दलात खळबळ

Subscribe

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत त्याने ससून रुग्णालयातून पळ काढल्याने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा (Pune Crime news ) आरोपी ससून रुग्णालयातून (Sasoon Hospital) पळाला आहे. मार्शल लुईस लीलाकर (Marshal Lilakar) असे फरार आरोपीचे नाव आहे. सोशल माध्यमावरून रील्स करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकवल्याचा आरोप लीलाकारवर आहे. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी लीलाकरला पुणे पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

हेही वाचा – UBT Convention: घराणेशाहीपेक्षा एकाधिकारशाही जास्त घातक; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

रविवारी पहाटे सुमारास लीलाकरने पोटात दुखत असल्याचा बहाणा केला. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी त्याला येरवडा जेलमधून ससून रुग्णालयात आणण्यात आले. यावेळीच संधी साधत त्याने पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. पळून गेलेल्या लीलाकर याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 8 पथके पाठवली असून त्याचा शोध सुरू आहे. ललित पाटील नंतर आणखी एक आरोपी ससून रुग्णालयातूनच पळून गेल्याने पुणे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वीच ड्रग्स माफिया ललित पाटील हा पोलिसांच्या हातावर गुंगारा देऊन पसार झाला होता. त्यानंतर ड्रग्सचं मोठं रॅकेट समोर आलं होतं. ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना त्याला एक्सरेसाठी नेत असताना त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला होता. त्यानंतर तो ससूनमध्ये उपचार घेत असताना देशात ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं होतं. ससून रुग्णालयातील त्याचे काही फोटो समोर आले होते. त्यानंतर ससून रुग्णालयातील प्रशासन आणि पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं.

हेही वाचा – Worm In Dairy Milk : कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये जिवंत अळी? व्हायरल व्हिडीओनंतर कंपनीचं स्पष्टीकरण

मात्र त्यानंतर आता शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकावणारा आरोपी लीलाकर याने ससून रुग्णालयातून पळ काढल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याला पकडणं हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. काही दिवसांपूर्वीच कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर पत्नी स्वाती मोहोळला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. या प्रकरणी स्वाती मोहोळने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार लीलाकर याला अटक केली होती. मात्र आता त्याने पळ काढल्याने पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -