घरताज्या घडामोडीपुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची थेट दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची थेट दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

Subscribe

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली झाली आहे. नवल किशोर राम यांची पुण्याहून थेट दिल्लीला पंतप्रधान कार्यलयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. दरम्यान ते पुढील चार वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत. नवल किशोर राम यांना आदेश निघाल्यापासून तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्हाधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्याची सूचना देण्यात आली आहे. पण एका आठवड्याच्या आतच पुण्याचे जिल्हाधिकारी दिल्लीत उपसचिव म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

याबाबत केंद्र सरकारने पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. पुण्याचे जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली असून आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यलयात उपसचिव पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. २००८ च्या बॅचचे नवल किशोर राम हे सनदी अधिकारी आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मोठी बातमी; गणपतीसाठी कोकणात गेल्यावर फक्त १० दिवस क्वारंटाईन; ई-पासही रद्द


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -