Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE मुंबईपेक्षा पुण्यात कोरोनाचा अधिक कहर! २४ तासांत १० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

मुंबईपेक्षा पुण्यात कोरोनाचा अधिक कहर! २४ तासांत १० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

Related Story

- Advertisement -

संपूर्ण राज्यात कोरोना व्हायरसमुळे गंभीर परिस्थितीत निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात उद्यापासून १५ दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईपेक्षा पुण्यात कोरोना व्हायरसचा कहर अधिक आहे. पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत पुण्यात १० हजार ११२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ६८ हजार १२६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १० हजार ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

आज दिवसभरात पुण्यातील ९ हजार ८४३ जण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यामुळे आतापर्यंत पुण्यात ५ लाख ५७ हजार ४२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९९ हजार ९७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत गेल्या २४ तासांत ७ हजार ८९७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज मुंबईत ११ हजार २६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत ५ लाख ३५ हजार १७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतार्यंत मुंबईत ४ लाख ३४ हजार ९४१ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत आतापर्यंत १२ हजार ८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Lockdown: जनतेच्या तोंडाला पाने पुसली; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका


 

- Advertisement -