Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पुण्यात कोरोना रोखण्यासाठी Mission 100 days - विभागीय आयुक्त

पुण्यात कोरोना रोखण्यासाठी Mission 100 days – विभागीय आयुक्त

तिसऱ्या लाटेचीही सांगितली तयारी

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या अनुभवानंतर साधारपणे तीन महिन्यांपर्यंत लॉकडाऊनचा परिणाम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आम्ही येत्या तीन महिन्यांसाठीचे नियोजन केले आहे. येत्या दिवसांमध्ये साधारणपणे महिनाभर कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक राहील असा आमचा अंदाज आहे. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट हळू हळू ओसरत जाईल. म्हणून सध्या नियोजन करताना हे नियोजन आगामी तीन महिन्यांसाठी केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मिशन १०० डेज अशा मिशनचीही माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मिशनचा परिणाम म्हणजे तीन महिन्यांमध्ये दुसऱ्या लाटेवर नियंत्रण करता येणे शक्य होणार आहे. म्हणूनच त्याअनुषंगानेच उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही सौरभ राव यांनी स्पष्ट केले. पुण्यातील लोकप्रतिनीधींसोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर सौरभ राव बोलत होते. पुण्यात शनिवारपासून आठवड्याभराच्या संचारबंदी आणि जमावबंदीची घोषणा त्यांनी केली. पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत संचारबंदी आणि जमावबंदी लागू असणार आहे.

नेमक काय आहे Mission 100 days ?

संपुर्ण आठवड्याभराच्या कालावधी पुर्ण झाल्यानंतर पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच त्यानंतरच संचारबंदी आणि जमावबंदीच्या नियमांचा आढावा घेण्यात येईल असे राव यांनी सांगितले. पुण्यामध्ये कोरोनाच्या लसीकरणाच्या मुद्द्यावरही बोलताना सौरभ राव म्हणाले की कोरोनाविरोधात लसीकरणाची केंद्राचे धोरण हे सुस्पष्ट आहे. त्यामुळेच अनेकदा लसीकरणासाठी स्थानिक मुद्दे हे महत्वाचे ठरतात. सध्या केंद्राकडून पुण्यात ४५ पेक्षा अधिक वयोगट असलेली लोकसंख्या ही २८ लाख आहे. त्यामुळेच पुण्यात आगामी काळात कोरोनाच्या लसीकरणाचा वेग वाढवला तर आगामी दिवसात वयोगटाती मर्यादा ही दिवसेंदिवस खाली येणार आहे. त्यामुळेच येत्या १०० दिवसांमध्ये या मर्यादा शिथील होतील अशी आमची अपेक्षा आहे. त्याअनुषंगानेच आम्ही पुण्यात लसीकरणाबाबतचे नियोजन करत आहोत असेही राव यांनी सांगितले. हे १०० दिवसांचे आमचे स्वतःचे मिशन आहे. त्यामुळे १८ वर्षांच्या सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे आमचे उदिष्ट आहे. संशोधनानुसार १८ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना लस देणे शक्य आहे. आमची अपेक्षा हीच आहे की, येत्या दिवसांमध्ये पुण्यातला लसीकरणाचा वेग आणि पुण्यात केंद्राकडून मिळणारी लस या आधारावरच आम्ही प्रयत्न करत आहोत की प्रत्येक वयस्क नागरिकाला कोरोनाची लस मिळेल हे आमचे उदिष्ट या मिशन १०० डेज कार्यक्रमात असल्याचेही त्यांनी सांगितले. आमची केंद्रे सातत्याने वाढत आहेत. म्हणूनच आमच्या टीमने मायक्रो प्लॅनिंग केले आहे. सातत्याने कोरोना लसीकरण केंद्रामध्ये आम्ही वाढ करतो आहोत. गेल्या एकाच आठवड्यात आम्ही ११० कोरोना विरोधातील लसीकरण केंद्राची निर्मिती केली आहे. पुणे महापालिकेच्या २०० आणखी कोरोना लसीकरण केंद्राचा प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे यामध्ये वयाची अट ही कायम आहे. त्यामुळेच वेळेत आम्ही कोरोनाबाबतची लसीकरण मोहीम येत्या दिवसात पूर्ण करू असा आम्हाला विश्वास आहे.

पुण्यात तिसऱ्या लाटेचीही तयारी 

- Advertisement -

गेल्या वर्षापासून एक ट्रेंड दिसत आहे, तो म्हणजे कोरोनाची दुसरी लाट ही येत्या चार ते पाच आठवडे या लाटेचा प्रभाव कायम राहिल. याआधीच्या अनुभवानुसारच आम्ही नियोजन केले आहे. त्यानंतर कोरोनाची लाट ही दोन तीन महिन्यात कमी होईल. या महिन्यातच जास्तीत जास्त लोकांना कोरोना लस देता येईल असे आम्ही उदिष्ट ठेवले आहे. आता जे केंद्राचे धोरण आहे, त्यानुसार ४५ वयोगटावरील लोकांना लस देणे गरजेचे आहे. तसेच ४५ वयोगट असलेले २८ लाख लोक पुण्यात आहेत. त्यामुळे या लोकांना लस देताना दिवसाला १ लाख जणांना जरी दररोज लस दिली तरीही ३० दिवसात ३० लाख लोकांना लस देता येईल असे त्यांनी सांगितले. पण ४५ पेक्षा कमी वयोगटाच्या व्यक्तींना सध्या देता येणार नाही असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -