घरमहाराष्ट्रपुणेPune: पुणेकरांना दिवाळी भेट! गडकरींकडून 35 हजार कोटींच्या दोन प्रकल्पांची घोषणा

Pune: पुणेकरांना दिवाळी भेट! गडकरींकडून 35 हजार कोटींच्या दोन प्रकल्पांची घोषणा

Subscribe

पुणेकरांसाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खास दिवाळी भेट दिली आहे. पुणे जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 35 हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील वाहतूक आणखी सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे.

पुणे: पुणेकरांसाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खास दिवाळी भेट दिली आहे. पुणे जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 35 हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील वाहतूक आणखी सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून जिल्ह्यातील दोन मोठया रस्त्यांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.(Pune Diwali gift to Punekars Announcement of two projects worth 35 thousand crores by Nitin Gadkari)

असे आहेत प्रकल्प

नितीन गडकरी यांनी मंजुरी दिलेल्या मोदी प्रकल्पांत एक प्रक्लप पुणे शहराशी संबंधित आहे. पुणे शहरातील रस्ता, उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो अशा ट्रिपल योजनेचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी वीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुसरा प्रक्लप पुणे-छत्रपती संभाजीनगरमधील आहे. यो दोन शहरांना जोडणारा नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे. चाकण, तळेगावमार्गे हा रस्ता तयार होणार आहे. राज्य सरकारने नुकतेच पायाभूत सुविधा मंडळ स्थापन केलं आहे. या मंडळामार्फत हा महामार्ग तायर केला जाणार आहे.

- Advertisement -

पुण्याच्या विकासात भर

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रक्लापंना मंजुरी मिळाली आहे. यामुळे पुणे शहराच्या विकासात मोठी भर पडली असल्याचं गडकरींनी म्हटलं आहे.

पुणे शहरातील समस्यांसंदर्भात नितीन गडकरी यांनी यापूर्वी अनेकवाळा चिंता व्यक्त केली आहे. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकल्पावर भर दिला जात आहे. पुण्यात स्कायबसचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. स्काय बस, मेट्रो या प्रकल्पामुळे रस्त्यावरील वाहनं कमी होऊन प्रदूषण कमी होणार आहे. तसंच, पुणे शहरातील PMPLच्या बसेस इलेक्ट्रीक करण्यात येणार आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: शरद पवारांनी नाही सुरु केली दिवाळीत कुटुंबाने एकत्र येण्याची प्रथा; यंदा अजित पवारांची जाणवणार अनुपस्थिती )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -