घरताज्या घडामोडी'या' कुटुंबाने थेट मनसे प्रमुखांनाच दिले आव्हान

‘या’ कुटुंबाने थेट मनसे प्रमुखांनाच दिले आव्हान

Subscribe

पोलिसांनी केलेल्या कारवाईत हे तिनही नागरिक पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागल्याने याविषयी आता आम्ही कायदेशीर लढाई लढणार असल्याचा निश्चय त्यांनी केला आहे.

महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या मोर्चानंतर शनिवारी पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी तीन नागरिकांवर बांगलादेशी असल्याचा आरोप करत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हे तिनही नागरिक पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागल्याने याविषयी आता आम्ही कायदेशीर लढाई लढणार असल्याचा निश्चय त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्या नागरिकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पुणे पोलिसांविरोधात न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत पाकिस्तानी आणि बांग्लादेशीविरोधात भव्य मोर्चा काढला, राज्यात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी राहत असल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर काही दिवसांत मनसे कार्यकर्तांनी पुण्यातील सहकारनगरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबावर कारवाई करत ते बांगलादेशी असल्याचा आरोप केला. या प्रकरणी अधिक तपास केला असता या कुटुंबाकडे भारताचे नागरिकत्व असणारी कागदपत्रे सापडल्याने त्यांना सोडण्यात आले.

- Advertisement -

कशी केली कारवाई?

पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्याच्या जवळ राहणारे रोशन शेख, बाख्ती सरदार आणि दिलशाद हसन यांच्या घरी शनिवारी मनसे कार्यकर्तांनी धाड टाकली, हे नागरिक बांग्लादेशी असल्याचा दावा करत त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी प्रचंड मनस्ताप झाला असून मनसे आणि पुणे पोलिसांच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ठाण्यातून शोधमोहीमेला सुरूवात

या आधी मनसेने काही दिवसांपूर्वी ठाणे, बोरिवली भागात देखील अशाच प्रकारे कारवाई केली होती. यावेळी ठाण्यातील तीन कुटुंबांवर ते बांगलादेशी असल्याचा आरोप करत  त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी येथे राहणाऱ्यांकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट असल्याची माहीती त्यांनी दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -