घरमहाराष्ट्रलिफ्टमध्ये अडकलेल्या तरुणाची एक तासाने सुटका; वडिलांना अश्रू अनावर

लिफ्टमध्ये अडकलेल्या तरुणाची एक तासाने सुटका; वडिलांना अश्रू अनावर

Subscribe

पुण्यामध्ये बिल्डिंगची लाईट गेल्यामुळे एक तास तरुण लिफ्टमध्ये अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या १० मिनिटात त्याची सुटका केली.

पुण्यामध्ये लिफ्टमध्ये तब्बल एक तास अडकलेल्या तरुणाला सुखरुप बाहेर काढण्यात आले. आपला मुलगा सुखरुप बाहेर आल्याचे पाहून त्याच्या वडिलांना आनंदाश्रू आवरले नाही. चेतन ओसवाल असं लिफ्टमध्ये अडकलेल्या तरुणाचे नाव आहे. चेतन एक तास लिफ्टमध्ये अडकला होता. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत त्याची सुखरुप सुटका केली. आपला मुलाला सुखरुप बाहेर काढल्यानंतर चेतनच्या वडिलांना अश्रू अनावर झाले त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले.

अवघ्या १० मिनिटात सुटका

भवानी पेठेतील तिरुपती सहकारी संस्था या इमारतीच्या लिफ्टमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तरुण अडकल्याचा अग्निशमन दलाला फोन आला. चेतन ओसवाल हे तब्बल एक तास लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातीने घटनास्थळी धाव घेतली. एक तास लिफ्टमध्ये अडकलेले चेतन ओसवाल हे खूप घाबरलेल्या स्थितीत होते. त्यांना अगोदर जवानांनी धीर दिला. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या मधोमध लिफ्ट अडकलेली होती. त्यांना बाहेर काढणे कठीण होते. मात्र अवघ्या ५ ते १० मिनिटात चेतना याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

- Advertisement -

मुलाला पाहून वडिलांचे अश्रू अनावर

तब्बल एक तास लिफ्टमध्ये अडकलेल्या चेतनला सुखरुप बाहेर येताना पाहून त्याच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांना अश्रू अनावर झाले त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले. तुम्ही देवासारखे मदतीला धावून आलात आणि माझ्या मुलाला वाचवले, असे मत त्यांनी व्यक्त केले. अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी सचिन मांडवकर, वाहनचालक राजू शेलार, तांडेल राजाराम केदारी, जवान मंगेश मिळवणे, रऊफ शेख, योगेश चोरघे, प्रताप फणसे, अक्षय शिंदे, विठ्ठल शिंदे,रोहीत रणपिसे या जवानांनी चेतन ओसवाल यांना बाहेर काढण्यास मोलाची साथ दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -