मृतदेहाला अग्नी देताना अचानक उडाला भडका; 11 जण जखमी

स्मशानभूमीत मृतदेहला अग्नी देत असताना अचानक भडका उडाल्याने 11 जण जखमी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील संगमवाडी भागातील कैलास स्मशानभूमीत ही धक्कादायक घटना घडली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

west africa senegal accident massive fire broke out tiwaune hospital 11 newborns died
आफ्रिकेच्या सेनेगलमधील हॉस्पिटलमध्ये भीषण आग दुर्घटना; 11 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

स्मशानभूमीत मृतदेहला अग्नी देत असताना अचानक भडका उडाल्याने 11 जण जखमी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील संगमवाडी भागातील कैलास स्मशानभूमीत ही धक्कादायक घटना घडली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली.

या घटनेत ११ जण जखमी झाले असून दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या अचनाक भडका उडण्याच्या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडी कैलास स्मशानभूमीत एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.

अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या व्यक्तीचे नातेवाईक आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मृतव्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेहावर ठेवण्यात आलेल्या लाकडांवर ज्वलनशील पदार्थ टाकला होता. त्यानंतर मृतदेहाला अग्नी देण्यात आला. यावेळी अचानक भडका उडाल्याने जवळ उभे असलेले ११ जण जखमी झाले आहेत. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान, यातील सर्व जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – महाराष्ट्रात सध्या दोन भावांचं भांडण सुरु आहे, सेना-मनसेच्या हिंदुत्वाच्या वादावर ओवैसींची प्रतिक्रिया