घरताज्या घडामोडीचिंताजनक! पुण्यात २ लाख कोरोनाबाधित; देशातील सर्वाधिक रुग्णसंख्येचा पहिला जिल्हा ठरला

चिंताजनक! पुण्यात २ लाख कोरोनाबाधित; देशातील सर्वाधिक रुग्णसंख्येचा पहिला जिल्हा ठरला

Subscribe

पुणे जिल्ह्यात तब्बल २ लाख ३ हजार ४६८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे हा देशातील सर्वाधिक रुग्णसंख्येचा पहिला जिल्हा ठरला आहे.

पुणेकरांना धडकी भरणारी आकडेवारी समोर आली आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखाच्या वर गेली आहे. त्यामुळे आता पुणे हा देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला पहिला जिल्हा ठरला आहे. महाराष्ट्र सरकार आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात तब्बल २ लाख ३ हजार ४६८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी ४ हजार १६५ रुग्णांची कोरोना चाचणी केल्यानंतर पुणे शहरांनी २ लाखांचा टप्पा पार केला आहे.

कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढली

पुणे शहरात एका महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढली असून ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख होती. तर आता कोरोनाबाधित रुग्णांनी २ लाखांचा टप्पा पार केला असून याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या चाचण्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

पुण्याने दिल्लीलाही टाकले मागे

पुण्याच्या तुलनेत दिल्लीत देखील कोरोनाबाधितांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत पुण्याने दिल्लीलाही मागे टाकले आहे. दिल्लीत सोमवारपर्यंत बाधितांची संख्या १ लाख ५७ हजार इतकी होती. तर पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ९३ हजार ५२६ इतकी होती. तर पुण्यातील बाधितांची आकडेवारी २२ टक्के असून चाचण्यांची संख्या वाढली असल्याने बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे.

पुण्याचा रिकव्हरी रेट ७८ टक्के

पुण्याचा रिकव्हरी रेट ७८ टक्के असून आतापर्यंत १ लाख ७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सोमवार पर्यंत ४ हजार ६५१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – खासगी रुग्णालयात फक्त १८ टक्के कोरोनाबाधितांनाच भरावे लागले बिल; आरोग्यमंत्र्यांचा दावा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -