पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन मोझे यांचे निधन

पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन आणि उद्योजक सम्राट मोझे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

pune golden man samrat moze dies
पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन मोझे यांचे निधन

पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन आणि उद्योजक सम्राट मोझे यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सम्राट मोझे यांना मंगळवारी अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना पुण्यातील सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

मोझे यांची गोल्डमॅन म्हणून ओळख

सम्राट मोझे यांना गोल्डमॅन म्हणून ओळखले जायचे. कारण मोघे हे अंगावर भरमसाट सोने घालण्यासाठी प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा सोने घालण्याचा रेकॉर्ड ब्रेक केल्याचेही बोले जायचे. मोझे हे दररोज अंगावर जवळपास साडेआठ किलो सोने घालत होते. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला होता. त्याचप्रमाणे येरवड्यातील संगमवाडी येथे राहणारे सम्राट मोझे हे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते.


हेही वाचा – मीडियासमोर आले बनावट किम जोंग उन? काय आहे सत्य?