घरमहाराष्ट्रऑस्टिओमायलिटिस असलेल्या अर्भकावर यशस्वी उपचार

ऑस्टिओमायलिटिस असलेल्या अर्भकावर यशस्वी उपचार

Subscribe

ऑस्टिओमायलिटिस हा क्वचित आढळणारा विकार असून तो सहसा अपुऱ्या दिवसांत जन्माला आलेल्या अर्भकांमध्ये आढळतो. या आजाराचे निदान झालेल्या एक महिन्याच्या समीरचे (नाव बदलले आहे) प्राण वाचवण्यात एका रुग्णालयातला यश मिळाले आहे.

खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ऑस्टिओमायलिटिस या आजाराचे निदान झालेल्या एक महिन्याच्या समीरचे (नाव बदलले आहे) प्राण वाचवले. ऑस्टिओमायलिटिस हा हाडाला होणारा प्रादुर्भाव आहे. या आजाराची शंका आली तर तत्काळ वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन डॉ. सचिन भिसे, डॉ. तुषार पारीख आणि डॉ. समीर देसाई यांनी पालकांना केले आहे.

डॉक्टरांनी दिली माहिती

शरीराच्या डावीकडील खालच्या भागातील अवयवांची हालचाल ८-१० दिवसांपासून नीट करता येत नसल्याची तक्रार घेऊन या मुलाला पालकांनी मदरहूड हॉस्पिटलमध्ये आणले होते. त्याच्या डाव्या मांडीवर ५ दिवसांपूर्वीपासून सूज होती तर ३ दिवसांपासून त्याला ताप व खोकला होता. हे बाळ ८ दिवसांचे असतानाच त्याच्या उजव्या खांद्याखाली पस साचल्याचे लक्षात आले होते. त्यासाठी त्याला प्रतिजैवके (अॅण्टिबायोटिक्स) देण्यात आली होती. तपासले असता बाळ चिडचिडे झाल्याचे तसेच त्याला ताप असल्याचे लक्षात आले पण रक्तसंक्रमणाचा विचार करता (हेमोडायनॅमिकली) ते स्थिर होते. डाव्या बाजूला मांडीच्या भागात सूज आढळली. हा भाग स्पर्शाला गरम व मऊ लागत होता, त्वतेवर लाली होती. कटिप्रदेशाच्या हालचाली मर्यादित होत्या.

- Advertisement -

कटिप्रदेशाच्या एक्स-रेमध्ये डाव्या बाजूच्या हाडांलगत झीज दिसून आली आणि त्याच्या डाव्या मांडीच्या मऊ उतींना (सॉफ्ट टिश्यूज) सूज दिसून आली. कटिप्रदेशाच्या अल्ट्रासाउंड सोनोग्राफीत डाव्या मांडीच्या आतल्या भागात तसेच स्नायूंमध्ये एक मोठा असमान हायपोएकोइक भाग दिसून आला. तसेच डाव्या बाजूला हाडामध्ये अनियमितता व झीज पार्श्वभूमीला दिसून आली. मांडीच्या हाडाला ऑस्टिओमायलिटिस आणि कटिप्रदेशात सेप्टिक संधिवात असे निदान झाल्याने बाळाला एनआयसीयूमध्ये दाखल करून घेऊन प्रतिजैवके सुरू करण्यात आली.

क्वचित आढळणारा विकार

ऑस्टिओमायलिटिस हा क्वचित आढळणारा विकार असून तो सहसा अपुऱ्या दिवसांत जन्माला आलेल्या अर्भकांमध्ये आढळतो. सेप्टिक आर्थरायटिस (संधिवात) ही एक अस्थिविकारांसदर्भातील आपत्कालीन परिस्थिती असून, त्यावर उपचारांस विलंब झाला किंवा योग्य उपचार मिळाले नाहीत, तर नितंबाच्या सांध्याच्या विकासावर त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच, दीर्घकाळातील गुंतागुंत टाळायची असेल, तर वेळेवर निदान आणि प्रभावी उपचार अत्यावश्यक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -