घरमहाराष्ट्रPune Pollution :प्रदूषणाबाबत पुण्यातील परिस्थिती चिंताजनक

Pune Pollution :प्रदूषणाबाबत पुण्यातील परिस्थिती चिंताजनक

Subscribe

मुंबई दिल्ली पाठोपाठ आता पुण्यामधील हवेची गुणवत्ता खालावली आहे. दिवाळीतमध्ये लक्ष्मी पूजनानंतर वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळतं. फटाक्यांच्या आतिषबाजीने होणारे प्रदूषण यामुळे श्वसनाचे त्रास नागरिकांना होत आहेत. याच कारणामुळे नागरिकही त्रस्त झाल्याचं चित्र आहे. सफर या संस्थेच्या आकडेवारीनुसार पी.एम.2.5 या धूलिकणांचे प्रमाण वाढलं असल्याचं सांगण्यात आलं.

पुण्याची हवा खराब झाल्यामुळे आरोग्यविषयी चिंता वाढू लागली आहे. मुंबईपेक्षा पुण्याची हवा अधिकच खराब झाल्याची नोंद भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्र् संस्थेच्या सफल संकेतस्थळावर झाली आहे. पुणेकरांना केवळ हवेचे प्रदूषणा सामोरे जावे लागत नाही आहेत तर कचरा आणि ध्वनी प्रदूषणाची त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी असते. विविध प्रकारे फटाके फोडले जातत.. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते. फटाक्यांच्या तीव्र आवाजामुळे ध्वनी प्रदूषणाची पातळीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशीनिमित्ताने मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर झाला. त्यामुळे आता हवा खराब झाली असून आरोग्यासाठी धोकादायक स्थिती पुण्यात निर्माण झाली आहे.

- Advertisement -

पुण्याची हवेची गुणवत्ता खालवली असून , अति सूक्ष्म धूलिकण आणि सूक्ष्म धुलिकणाच्या प्रमाणात दुप्पटीने वाढ झाली आहे. सोमवारी पहाटे शहरात घुरके पसरले होते. सफर च्या आकडेवरीनुसान भोसरीमध्ये सर्वाधिक जास्त पीएम २.५ आणि पीएम १० च्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुलिकणाच्या प्रमाणात वाढ झाल्याने हवेची गुणवत्ता खराब झाली आहे.

पु्ण्याचा सध्याचा  AQI हा 351 आहे. त्यातच Pollutant चा पीएम हा 2.5 इतका आहे. पुण्यातील इतर शहरांची स्थिती आणि त्यांचा  AQI किती आहे. तसेच . PM 2.5 मुळे हृदयविकार, दमा आणि नवजात मुलांच्या वजनात फरक पडणे यांसारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. PM 2.5 च्या वाढलेल्या पातळीमुळे दृश्यमानता कमी होऊ शकते आणि हवेत धुके दिसू लागते. अशी सध्याची पुण्याची स्थिती असली तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवेची गुणवत्ता कमी होत नसल्याचं सांगण्यात येत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -