घरताज्या घडामोडीपुणे किडनी रॅकेट प्रकरण : डॉक्टरांविरोधातील गुन्हे रुबी हॉल क्लिनिकने फेटाळले

पुणे किडनी रॅकेट प्रकरण : डॉक्टरांविरोधातील गुन्हे रुबी हॉल क्लिनिकने फेटाळले

Subscribe

पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, यामध्ये पुण्यातील नामांकित हॉस्पीटलचा सहभाग असल्याचं आढळून आलं आहे. याप्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे ट्रस्टी डॉ. परवेझ ग्रांट यांच्यासह हॉस्पिटलमधील 6 डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, यामध्ये पुण्यातील नामांकित हॉस्पीटलचा सहभाग असल्याचं आढळून आलं आहे. याप्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे ट्रस्टी डॉ. परवेझ ग्रांट यांच्यासह हॉस्पिटलमधील 6 डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुबी हॉल क्लिनिक हे पुण्यातील प्रतिष्ठीत आणि नामांकित हॉस्पिटल्स पैकी एक आहे. दरम्यान, या प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकने मोठा निर्णय घेतला आहे.

व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट, उपसंचालक रेबेका जॉन, कायदेशीर सल्लागारमंजूषा कुलकर्णी तसेच डॉ. अभय सद्रे, डॉ. मुफ्त भाटी, डॉ. हिमेश गांधी, सुरेखा जोशी यांच्यासह अमित साळुंखे, सुजाता साळुंखे, सारिका सुतार, अण्णा साळुंखे, शंकर पाटील, सुनंदा पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने यांच़्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी तक्रार दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, डॉक्टरांविरोधात दाखल झालेले गुन्हे रुबी हॉल क्लिनिकने फेटाळून लावले आहेत. “कोणताही दोष नसताना डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केल्याचा दावा रुबी हॉल क्लिनिकच्या कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी यांनी केला आहे. किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी आमचा दोष नसताना आमच्या विरोधात गुन्हा दाखल दाखल झाला आहे. ज्यांनी खोटे आधार कार्ड, पोलीस पडताळणी पत्र, विवाह प्रमाणपत्रासारखे कागदपत्रे तयार केली, त्यांना दोषी धरायला हवे. ज्या रुग्णाने पैसे देण्याचे आमिष दिले त्यात आमची कोणतीही भूमिका नाही. तरीही आमच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच या प्रकरणी कायदेशीर लढाई लढण्याची तयारी आहे.

रूबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट आणि कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी यांच्यासह 15 जणांविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फसवणूक आणि मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 लाख रुपयांच्या आमिषाने एका महिलेचे किडनी प्रत्यारोपण केल्याचे प्रकरण मार्चमध्ये उघड झाले होते. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना निलंबित केला आहे.

- Advertisement -

असा झाला किडणी रॅकेटचा पर्दाफाश

अमित साळुंखे या रुग्णाने सारिका सुतार या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून रूबी हॉलमध्ये किडनी प्रत्यारोपण केले. साळुंखे याने सादर केलेली कागदपत्रे ग्राह्य धरून प्रत्यारोपण समितीने किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली. 15 लाख रुपये मिळाले नाही म्हणून सारिका सुतार यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. या तक्रारीनंतर किडनी तस्करीचे प्रकरण उघड झाले. आता या प्रकरणी पैशासाठी किडनी विकणाऱ्या महिलेलाही आरोपी करण्यात आले आहे.


हेही वाचा – स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा होणार वापर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -