घरमहाराष्ट्रपुणे लॉकडाऊनचा निर्णय अजितदादांनी परस्पर घेतला; गिरीश बापट यांचा आरोप

पुणे लॉकडाऊनचा निर्णय अजितदादांनी परस्पर घेतला; गिरीश बापट यांचा आरोप

Subscribe

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घ्या

पुण्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात आणि पिंपरीमध्ये सोमवारपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनबाबतचे आदेश दिले. अजित पवार यांच्या निर्णयावरुन भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी नाराजी व्यक्त करत अजित पवार यांनी परस्पर निर्णय घेतल्याचं आरोप केला आहे. हा निर्णय घेताना कोणालाच विश्वासात घेतलं नसल्याचंही बापट म्हणाले.

अजित पवार यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता लॉकडाऊनचा निर्णय घेतला. ‘मास्क लावला नाही, शरीररिक अंतर पाळलं नाही, तर कडक कारवाई करा. पण तीन टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून लॉकडाउनसारखा मोठा निर्णय घेऊ नका,’ असं गिरीश बापट म्हणाले. एकीकडे अनलॉकचे निर्देश द्यायचे आणि दुसरीकडे पुण्यासारख्या शहरात लॉकडाऊन लागू करायचा हे कसलं धोरण? असा सवालही बापट यांनी केला आहे. शिवाय, पुणे शहर व्यापारी संघाने लॉकडाऊनच्या निर्णयाचा विरोध केला आहे. पुणे शहर पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं तर उद्रेक होईल, असा इशारा व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद्र राका यांनी दिला आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -