घरCORONA UPDATEPune Lockdown - काय राहणार चालू? काय राहणार बंद?

Pune Lockdown – काय राहणार चालू? काय राहणार बंद?

Subscribe

येत्या सात दिवसात पुण्यात जमावबंदी आणि संचारबंदी लागू

पुण्यात मुंबईपेक्षा कोरोना परिस्थिती भयावह आहे. मुंबईपेक्षा पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. याच संदर्भात आज पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी येत्या सात दिवसांसाठी जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पुढील आठवडा पुण्यात दिवसा जमावबंदी तर संध्याकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी असणार आहे. यादरम्यान पुण्यात कोणत्या सुविधा सुरू असणार आणि कोणत्या बंद असणार याबाबत जाणून घ्या…

पुण्यात सात दिवस काय सुरू राहणार?

  • लग्न, अंत्यसंस्कार कार्यक्रमाला परवानगी
  • लग्न सोहळ्यासाठी ५० जणांचा उपस्थित राहण्याची परवानगी
  • अंत्यसंस्कारासाठी २० जणांचा उपस्थित राहण्यास परवानगी
  • फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
  • हॉटेल, रेस्टॉरंटमधील पार्सल सेवा सुरू राहणार
  • १०वी, १२वी आणि MPSCच्या परीक्षा नियोजित वेळेत होणार
  • जीम आठवड्याभरासाठी सुरू असणार

आठवड्याभरासाठी पुण्यात काय बंद असणार?

  • PMPML बससेवा आठवडाभर बंद राहणार
  • सर्व धार्मिक स्थळे, मॉल्स, थिअटर्स आठवडाभरासाठी बंद
  • सात दिवसांसाठी हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहणार
  • सामाजिक, राजकीय कार्यक्रमावर बंदी
  • आठवडे बाजारपेठ बंद राहणार
  • शाळा, महाविद्यालय ३० एप्रिलपर्यंत बंद असणार

हेही वाचा – Mumbai Corona Update: खासगी रुग्णालयांचे बेड्स कमी पडू लागल्याची महापौरांची कबुली

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -