घरताज्या घडामोडीPune : पुण्यात लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच, कोल्हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता

Pune : पुण्यात लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच, कोल्हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता

Subscribe

आगामी काळात लोकसभा (Loksabha Elections 2024) आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यावेळी केंद्र सरकारसह महाराष्ट्रात (Maharashtra) सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयार सुरू आहे. राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीकडून (MVA) लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने लोकसभेसाठी १८ जागांवर दावा ठोकला आहे. तर राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. परंतु पुण्यात एका जागेसाठी राष्ट्रवादीत (NCP)  रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तर याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे भाजपात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

भोसरीचे पहिले आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. कारण तसे बॅनर देखील भोसरी परिसरात लागले आहेत. विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त या संपूर्ण परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्या बॅनरवर भावी खासदार असा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यामुळे आता विलास लांडे हे देखील खासदारकीची निवडणूक लढवणार का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. त्यामुळे या एका जागेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

कोल्हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता

लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी मध्येच अंतर्गत स्पर्धा सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शरद पवार यांनी नुकतेच लोकसभेसाठी दोन नेते त्यांच्या मनात असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, यामध्ये माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अमोल कोल्हे या दोन नेत्यांची नावं असल्याचे सांगितले होते. परंतु विलास लांडे यांनी या जागेवर दावा ठोकल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीसमोर एक नवं आव्हान उभं राहणार असून येणाऱ्या काळात ही जागा कोणाला मिळणार?, हे पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

आघाडीनुसार पुण्याची जागा कुणाची?

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असताना पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा नेहमीच काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते विश्वजित कदम यांनी तर २०१९ मध्ये काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तर २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेना-भाजपा युतीत पुण्याची जागा भाजपकडेच होती. त्यामुळं पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने नव्याने दावा केला आहे. परंतु आता महाविकास आघाडीत अद्याप लोकसभेसाठीचं जागावाटप झालेलं नाही. त्यामुळं तिन्ही पक्षातील नेते एकत्र बसल्यानंतरच पुण्याची जागेबाबतचा पेच सुटणार आहे.

मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद जास्त?

पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा पेठ, कोथरूड, पर्वती आणि पुणे छावणी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातील चार मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक आमदार आहे. आमदारांची संख्या जास्त असल्यामुळं भाजपला पुणे लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून गिरीश बापट यांच्या सूनबाई इच्छुक; म्हणाल्या…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -