घरमहाराष्ट्रपुणेकरांनो प्रवासाला निघाण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक पाहा, लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

पुणेकरांनो प्रवासाला निघाण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक पाहा, लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

Subscribe

डिसेंबर आणि न्यू ईअर सेलिब्रेशननिमित्त पर्यटनासाठी पुणे ते लोणावळ्यादरम्यान जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतेय. त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांनी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र आता पुढे काही दिवस पुणे आणि लोणावळादरम्यान प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा. कारण रेल्वे ट्रॅक दुरुस्ती कामानिमित्त पुणे – लोणावळा लोकल सेवेसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे – लोणावळा मार्गावरील मळवली ते कामशेतदरम्यान रेल्वे रुळाचे काम करण्यात येणार असल्याने गुरुवारी ( २२ डिसेंबर) आणि शुक्रवारी (२३ डिसेंबर) या मार्गावरील वाहतूकीला ब्रेक लागणार आहे. लोणवळा लोकल रेल्वेसह एक्सप्रेस गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

या काळात काही रेल्वे गाड्या उशिराने धावणार आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी (२३ डिसेंबर) पुणे- लोणावळा लोकल सेवेच्या दुपारच्या काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावरील मळवळी ते कामशेतदरम्यान रेल्वे ट्रॅकसह काही तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (२२ डिसेंबर) पुणे- भुसावळ गाडी रद्द करण्यात आली आहे, तर शुक्रवारी (२३ डिसेंबर) पुणे- भुसावळ, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, पुणे-लोणावळ दरम्यान धावणाऱ्या सकाळी 11 वाजून 17 मिनिटे ,दुपारी 3 वाजता, दुपारी 4 वाजून 25 मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल सेवेच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे.

यासोबत पुणे-तळेगाव, लोणावळा-पुणे,तळेगाव-पुणे दरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी (23 डिसेंबर) दुरांतो एक्सप्रेस सकाळी 11 वाजून 10 मिनिटांऐवजी दुपारी 4 वाजून 45 मिनिटांनी सुटेल. दौंड एक्सप्रेस 1 तास उशीराने दुपारी 3 वाजता रवाना होईल. चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनल गाडीला उशीराने मार्गस्थ होईल. शनिवारी (२४ डिसेंबर) भुसावळ- पुणे एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


भाजपचे राजकीय सोहळे बिनबोभाट सुरू, फक्त… ‘सामना’तून मोदी सरकारवर टीकास्त्र


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -