पुणे : Acid फेकण्याची धमकी देत बलात्कार

Acid फेकण्याची धमकी देत एका शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

सहावीतल्या मुलीवर बलात्कार

हिंगणघाट जळीतकांडातील मृत्यूशी झुंज देणाऱ्या पीडितीचा सोमवारी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच Acid फेकण्याची धमकी देत एका शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी प्रतीक आंग्रे (२५) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नेमके काय घडले?

पीडित मुलगी शाळेत जात असताना प्रतीक आंग्रे तिचा सतत पाठलाग करत होता. तसेच तिला सातत्याने त्रास देखील द्यायचा. त्यानंतर त्यांनी तिला धमकवण्यास देखील सुरुवात केली होती. दरम्यान, एक दिवस त्याने तिला गाठून तुझ्या चेहऱ्यावर Acid टाकेन आणि तुझ्या कुटुंबियांना देखील जिवे मारेन अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने शाळकरी मुलीला भेटायला बोलावले आणि तिला धमकावून त्याने दुचाकीवरुन नेले आणि एका घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर याबाबत कोणाला बोलू नको आणि कोणाला सांगितल्यास मोबाइलवर चित्रफीत प्रसारित करीन, अशी धमकी देखील दिली. मात्र, घाबरलेल्या मुलीने आपल्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पीडितीच्या आईने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास करून आंग्रेला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – नवरा-बायकोच्या भांडणात मुलाचा मृत्यू