घरताज्या घडामोडीPune Fire : फॅशन स्ट्रीट आगीच्या भक्ष्यस्थानी ४०० दुकानांची राखरांगोळी

Pune Fire : फॅशन स्ट्रीट आगीच्या भक्ष्यस्थानी ४०० दुकानांची राखरांगोळी

Subscribe

पुणे शहरातील लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यालगतच्या प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट येथे भीषण आग लागली असून या आगीत ४०० दुकाने जळून खाक झाली आहेत.

आगीच्या घटनांनचे सत्र सुरु असतानाच पुण्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे शहरातील लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यालगतच्या प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट येथे शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच कँटोन्मेंट अग्निशमन केंद्र आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान, दोन ते अडीच तासांने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. या आगीमध्ये तब्बल ४०० दुकाने जळून खाक झाली असून सध्या कूलिंगचे काम सुरु असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

कोणतीही जीवितहानी नाही

पुण्याच्या कॅम्प परिसरात लागलेल्या भीषण आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेले नाही. तब्बल तीन तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे. मात्र, या आगीत ४०० हून अधिक दुकाने जळून खाक झाली आहेत. यामुळे व्यापाऱ्यांचे कोटीचे नुकसान झाले आहे. परंतु, या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान, कुलिंग ऑपरेशन झाल्यानंतर प्रकाश हसबे घरी जात होते. त्यावेळी त्यांचा येरवड्याजवळ वाहानाचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -