घरताज्या घडामोडीपुण्यात भुयारी मार्गावर 'मेट्रो'ची पहिली चाचणी; पुढील वर्षात सुरू होण्याची शक्यता

पुण्यात भुयारी मार्गावर ‘मेट्रो’ची पहिली चाचणी; पुढील वर्षात सुरू होण्याची शक्यता

Subscribe

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. भूमिगत मेट्रोच्या पहिल्या 3 किलोमीटर टप्पा असलेल्या मार्गावर आज पहिली चाचणी पार पडली. शिवाजी नगर ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर ही चाचणी पार पडली. विशेष म्हणजे नव्या वर्षातील मार्च 2023 पर्यंत पुणे मेट्रो सुरु होण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्धार आहे.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. भूमिगत मेट्रोच्या पहिल्या 3 किलोमीटर टप्पा असलेल्या मार्गावर आज पहिली चाचणी पार पडली. शिवाजी नगर ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर ही चाचणी पार पडली. विशेष म्हणजे नव्या वर्षातील मार्च 2023 पर्यंत पुणे मेट्रो सुरु होण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्धार आहे. दरम्यान, पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम हे 85 टक्क्यांहून अधिक झाल्याची माहिती, मेट्रो अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Pune Metro Trial Run From Range Hill To Shivajinagar Station On Underground Stretch)

पुण्यातील भूमिगत मेट्रोच्या पहिल्या 3 किलोमिटर टप्पा असलेल्या मार्गावर पहिली चाचणी पार पडली. पुण्यातील रेंज हिल डेपोपासून एलिव्हेटेड मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रो धावली आणि त्यानंतर ही मेट्रो रॅम्पचा सहाय्याने भूमिगत ट्रॅकवर आणण्यात आली. शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर या ट्रेनची चाचणी करण्यात आली आणि तिथून पुढील स्टेशन सिव्हिल कोर्ट या स्टेशनवर देखील मेट्रोची चाचणी पार पडली.

- Advertisement -

मेट्रोचे एकूण अंतर हे 33 किलोमीटर आहे. यात 10 किलोमीटर अंतर हे भूमिगत तर 27 किलोमीटर एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. तसेच, पुणे मेट्रोसाठी एकूण 11,420 कोटी रुपये खर्च येणार आहे. पुण्यात वनाज ते गरवारे हा पहिला टप्पा सध्या सुरु करण्यात आला आहे. या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी वनाज ते डेक्कन या मार्गावर मेट्रोचाचणी करण्यात आली होती. ती चाचणी यशस्वी ठरली आहे.

दरम्यान, पिंपरी ते सिव्हिल कोर्ट सेवा दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ने (महामेट्रो) भुयारी मार्गातील चाचणीचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. भूमिगत स्थानकावर आज झालेली चाचणी हे पुणे मेट्रोसाठी एक नवीन आणि यशस्वी पाऊल आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना भूमिगत मार्गावरील मेट्रोत प्रवास करता येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -