घरट्रेंडिंगआधी जन्म टेस्टिंग किटचा, मग माझ्या बाळाचा

आधी जन्म टेस्टिंग किटचा, मग माझ्या बाळाचा

Subscribe

भारतात करोनाच्या चाचण्यांमध्ये भारत पिछाडीवर असल्याची आता टीका होऊ लागली आहे. मात्र अशा सगळ्या आव्हानाच्या परिस्थितीतही करोनाविरोधातली एक मोठी कामगिरी या आईने केली आहे. देशातील एका व्हायरोलॉजिस्टने आपल्या गरोदरपणातील अंतिम टप्प्यातही एक मोठ योगदान देत करोनाच्या टेस्टिंग किटची कामगिरी पुर्ण करण्यात यश मिळवले आहे. आपल्या स्वतःच्या बाळाला जन्म देण्याआधी या आईने टेस्टिंग किटचे काम पुर्ण केल्याने आता सगळ्या स्तरातून या आईचे कौतुक होत आहे. किट्सचे काम पुर्ण झाल्यानंतर या आईने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी करोनाचे टेस्टिंग किट बाजारात मिळू लागले आहे. त्यामुळे करोनाची चाचणी आणि स्क्रिनिंगचे प्रमाण वाढण्यासाठी मदत मिळणार आहे. करोनाची लक्षणे असलेल्यांची सहज सोपी चाचणी करणे या किटमुळे शक्य होईल. पुण्यातील मायलॅबने देशात कर्मशीअल तत्वावर करोना किट तयार करण्यासाठीचा परवानगी मिळवली आहे. देशाअंतर्गत किट तयार करणारी ही पहिली कंपनी आहे. मायलॅबने पहिल्या बॅचमध्ये एकुण १५० किट्स तयार करून पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा, बंगळुरू यासारख्या ठिकाणी लॅबमध्ये पाठवले आहेत. करोनाची चाचणी अवघ्या अडीच तासांमध्ये करणे या किटमुळे शक्य झाले आहे.

- Advertisement -

पुण्यात मायलॅबमध्ये काम करणाऱ्या मिनल दाखवे भोसले या कंपनीत संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख आहेत. अतिशय रेकॉर्ड ब्रेकिंग वेळेत म्हणजे चार महिन्याएवजी या महिलेने अवघ्या सहा आठवड्यात हे काम पुर्ण केले आहे. स्वतःदेखील ही महिला आपल्या बाळाच्या डिलिव्हरीच्या डेडलाईनसोबत लढा देत होती. डिलिव्हरीची तारीख जवळ आलेली असतानाही या महिलेने किट तयार करण्याच्या कामाला प्राधान्य दिले. किट तयार होताच काही तयार त्यांनी बाळाला जन्म दिला.

करोनामुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती होती, म्हणूनच मी हे आव्हान स्विकारले. मला माझ्या देशासाठी काही तरी भरीव योगदान द्यायचे होते. माझ्या दहा सहकाऱ्यांसह आम्ही खूप मेहनत घेत हा प्रकल्प यशस्वी केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यानंतर १८ मार्चला आम्ही टेस्टिंग किट जमा केले. त्यानंतर काही तासातस मी एका सुंदर मुलीला जन्म दिला असे त्यांनी सांगितले.

एक प्रतिक्रिया

  1. Kit was not developed by Ms. Minal, as from last 2 months Minal was at home, no work. Science & research can’t done from home. Time will light on this. You can Confirm with Mylab management team & actual kit developed by other team of Girls. Wrong News given by @BBCIndia

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -