घरमहाराष्ट्रवाहन चालवता-चालवता उबर चालक झोपला आणि...

वाहन चालवता-चालवता उबर चालक झोपला आणि…

Subscribe

पुणे-मुंबई असा प्रवास करताना उबर चालक डुलक्या घेऊ लागला. प्रवासी तरूणींने वाहन चालविण्याचा निर्णय घेत गाडी अंधेरीपर्यंंत तिच्या घरपोच आणली. संबंधित उबर चालकाचा अॅप अॅक्सेस निलंबित करण्यात आल्याची माहिती उबरच्या प्रवक्त्यांनी सांगितली आहे.

पुणे-मुंबई असा प्रवास करताना उबर कंपनीचा वाहन चालक गाडी चालवताना डुलक्या घेत होता. वाहनातील प्रवासी तरूणींच्या लक्षात आल्यावर तिने वाहनाच्या स्टेअरिंगचा ताबा घेतला आणि कार चक्क मुंबईपर्यंत आणली. प्रवासी तरूणींनी या प्रकाराची तक्रार कंपनीकडे केली असून या गंभीर प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. मुंबईतील अंधेरी येथील प्रवासी तरूणी राहते. आणि तिचे आई-वडील पुण्यातील वानवडी येथे वास्तव्याला आहेत. पालकांना भेटण्यासाठी ती वानवडीत गेली होती. पुण्यातून मुंबईकडे रवाना होताना तिने एक उबर कॅब बुक केली, अशी माहिती या तरूणीने एका वृत्तपत्रांशी बोलताना दिली.
माझ्याकडे चार बॅग आणि लॅपटॉपही होता. उबर कॅब बुक केल्यावर दुपारी एकच्या सुमारास कार एक्स्प्रेस-वेवर पोहोचली. गाडीत बसल्यावर थोड्या अंतराचा प्रवास केल्यावर दिसून आले की, चालक डुलक्या घेत आहे. वाहन काळजीपूर्वक चालव, असे त्याला सांगितले. काही वेळाने मी पालकांशी फोनवर बोलू लागले. एक टोलनाका सोडल्यानंतर चालक डुलक्या घेत असताना दोन अपघात होताना टळले, असे तरूणीने सांगितले. एकावेळेला मनात असे आले की, कारमधून उतरावे. परंतु एक्स्प्रेस वेवर दुसरी कॅब किंवा कार मिळणे कठीण होते. त्यावेळी मी कार चालविण्याचा निर्णय घेतला. तेव्हा चालकाला कार बाजूला घेण्यास सांगून मी कार चालवते असे त्याला सांगितले. कार चालक सीटवरून उठून चालकाच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला. अंधेरीपर्यंत कार चालवून घरी पोहोचायच्या २० मिनीटे आधी चालक झोपेतून उठला, असेही यावेळी तरूणींने सांगितले.

कॅब बुकिंग करणे झाले धोकादायक…

आता कॅब बुकींग करण्याची फार भीती वाटते. घडल्या प्रकरणाची जबाबदारी उबर कंपनीच्या व्यवस्थापनाने घ्यावी, आणि यासाठी पाठपुरावा करत आहे, असेही ती म्हणाली. संबंधित उबर चालकाचा अॅप अॅक्सेस निलंबित करण्यात आले आहे. तसेच खेदाची व चिंतेची बात असल्याचे उबरच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -