Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र जम्बो कोविड सेंटरमधील राजकारणामुळे डॉक्टरांचा काम बंदचा इशारा

जम्बो कोविड सेंटरमधील राजकारणामुळे डॉक्टरांचा काम बंदचा इशारा

Related Story

- Advertisement -

पुण्यातील शिवाजीनगर जम्बो कोविड रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून जेवण पुरवण्याचे कंत्राट मिळवण्यावरून राजकारण सुरु झाले आहे. या राजकारणात आता डॉक्टरांनाही ओढण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी जम्बो कोविड रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत डॉक्टरांसह संचालकांना धारेवर धरले. या सर्व डॉक्टरांसह संचालकांना शुक्रवारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह महापौर, सभागृह नेते यांची भेट जम्बो कोविड रुग्णालयातील काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

शिवाजीनगर जम्बो रुग्णालयातील कारभार महापालिकेच्या खर्चाने चालवला जातो. त्यामुळे पालिकेतील काही पदाधिकारी जम्बो रुग्णालयात सेवा पुरवणाऱ्या एजन्सीवर नियंत्रण मिळण्यासाठी पदाचा दुरुपयोग करत आहेत. या एजन्सीमार्फत जम्बो रुग्णालयात सध्या सहाशे रुग्ण व डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ मिळून एक हजार जणांना दोन वेळचे जेवण आणि नाश्ता येथील कॅन्टीनमधून दिला जातो. दरम्यान या एजन्सीमार्फत चालवण्यात येणारे जेवणाचे कंत्राट एका राजकीय कार्यकर्तीला मिळवून देण्यासाठी पालिकेचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. तसेच या खासगी एजन्सीच्या ठेकेदाराला धमकावल्याचे प्रकार उघडीस आले.

- Advertisement -

याचदरम्यान जम्बोतील काही डॉक्टरांना पालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले. तसेच उच्चपदस्थ महिला डॉक्टरलाही त्रास दिल्याची तोंडी तक्रार करता काही महिला डॉक्टर महापालिका अधिकाऱ्यांकडे रडताना दिसल्या. या त्रासाला कंटाळून जम्बोतील संचालक आणि डॉक्टरांनी काम थांबवण्याचा इशारा दिल्याने महानगरपालिकेचे धाबे दणाणले आहेत.

सध्या शिवाजीनगर जम्बो रुग्णालयात ईस्कॉन मंदिराशी संबंधित एजन्सीकडून १८० प्रतिव्यक्तीनुसार जेवणाचे कंत्राट सांभाळले जात आहे. मात्र पालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांना हातीशी धरत राजकीय पक्षाचा कार्यकर्तीला हे कंत्राट ३०० प्रतिव्यक्ती दराने हवे आहे. परंतु या दरात कंत्राट देण्यास नकार दिल्याने जम्बोच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे की काय असा प्रश्न महानगरपालिकेत उपस्थित होत आहे. दरम्यान पु्ण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांच्या उपचाराला प्राथमिकता देण्याऐवजी महानगरपालिकेचे पदाधिकारी जेवणाच्या कंत्राटावरून राजकारण करत असल्याने प्रशासन चक्रावले आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -