पुणे : ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या विवाहितेची प्रियकरानी केली हत्या

'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या विवाहितेची प्रियकरानी हत्या केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे.

Grandfather and uncle committed the murder; Unravel the challenging crime
Grandfather and uncle committed the murder; Unravel the challenging crime

पतीपासून वेगळे झाल्यानंतर प्रियकरासोबत राहणाऱ्या एका विवाहितेची तिच्या प्रियकरानेच हत्या केल्याची घटना पिंपरी येथे घडली आहे. ही घटना १९ मे रोजी रात्रीच्या वेळी घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपी महेश मल्हारी खंडागळे (२८) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीपासून वेगळे झाल्यानंतर विवाहित महिलेचे पिंपरी येथील कासारवाडी येथे राहणाऱ्या महशे या मुलांसोबत प्रेम संबंध निर्माण झाले होते. ते दोघे लग्नही करणार होते. त्यांच्या लग्नाच्या निर्णयाला विवाहितेच्या आईची देखील परवानगी होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आरोपी महेश यांनी विवाहितेकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र, विवाहिता लग्नास तयार नसल्याने तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरुन विवाहितेचे आणि महेश या दोघांमध्ये मंगळवारी भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की, प्रियकरांनी विवाहितेचा गळा आवळून खून केला.

आत्महत्या केल्याचा बनाव

खून केल्यानंतर विवाहितेने आत्महत्या केल्याचा बनाव आरोपी महेश याने रचला होता. मात्र, पोलिसांना त्याच्या हालचालीवरुन शंका आल्याने त्याच्याकडे उलटतपासणी केली असता. त्याने विवाहितेचा खून केल्याची कबुली दिली.


हेही वाचा – २२ मेपासून नवे लॉकडाऊन नाही; अफवांमुळे संभ्रम