ब्रेकिंग – खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटला आहे दरम्यान दांडेकर पूल परिसरातील रस्त्यांला नदीचे स्वरूप आल्याने वाहनचालकांसह पदचा-यांची चांगलीच धावपळ झाली आहे pic.twitter.com/3nLSMB3nV2
— My Mahanagar (@mymahanagar) September 27, 2018
दरम्यान ज्या लोकांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्या सर्वांच्या खाण्या-पिण्याची सोय, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांनी जवळच्या समाजमंदिरांमध्ये केली आहे. याशिवाय बाधित नागरिकांच्या सुरिक्षततेच्यादृष्टीने आवश्यक सर्व मदत याठिकाणी पुरवली जात आहे. मुठा कालव्यात १२०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते हा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले असून घरे,रस्ते,ओढे,नाल्यांमध्ये पाणी घुसल्यानं मोठी वित्तहानी झाली आहे.जलसंपदा विभागाच्या बेफिकीरीमुळंच हा प्रकार घडला असून पुणेकरांकडून सोशल मिडियाद्वारे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. मुठा नदीच्या या कालव्याची दुरवस्था गेल्या अनेक दिवसपासुन झाली असताना स्थानिक नगरसेवकांनी पाठबंधारे विभागाकडे लेखी तक्रारीही केल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने हि दुर्घटना घडली असल्याचे स्थानिक नगरसेवकांनी सांगितले.