घर महाराष्ट्र देशातील शांतता भंग करण्याचा भाजपचा डाव; शरद पवारांचा घणाघात

देशातील शांतता भंग करण्याचा भाजपचा डाव; शरद पवारांचा घणाघात

Subscribe

देशातील शांतता भंग करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर केला आहे. पुण्यात ते बोलत होते.

पुणे: देशातील फाळणीचा इतिहास हा अत्यंत क्लेशदायक असा इतिहास होता. रक्तपाताचा हा इतिहास होता. त्यामुळे नव्या पिढीसमोर हा रक्तरंजित इतिहास जाऊ नये, अशी भूमिका सतत मांडली गेली. परंतु आता हे मोदी सरकार या मुलांना हा इतिहास फाळणीतील भयानक घटनांचा स्मरण करण्याचा दिवस या नावाखाली शिकवा , असं म्हणत आहे, तसा सराकारी आदेश काढण्यात आल्याचं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. म्हणजे मुलांमध्ये एकमेकांच्या धर्माबाबत तेढ निर्माण होईल,  त्यामुळे देशातील शांतता भंग करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर केला आहे. पुण्यात ते बोलत होते.(Pune NCP President Sharad pawar Criticized Modi Government over Partition Chapter in books to teach students new generation)

ईडीच्या भीतीने काही जण भाजपसोबत

पवार म्हणाले की, अलिकडे आपल्यातील काही लोक पक्षाबाहेर गेले आहेत. विकासासाठी भाजपसोबत गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्यात काही अर्थ नाही. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. ईडीच्या भीतीने काही जण भाजपसोबत जाऊन बसलेत, अशी टीका शरद पवार यांनी अजित पवार गटावर केली.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या निर्णयावरून शरद पवार यांनी टीका केली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 31 डिसेंबरपर्यंदत 40 टक्के शुल्क लावणार असल्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांनी या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीका केली, कांद्यावर शुल्कवाढ केल्यानं शेतकऱ्यांसाठी जगातलं मार्केट बंद झालं, अशा शब्दात शरद पवार यांनी केंद्राच्या निर्णयावर टीकास्त्र डागलं

सरकारक़डून अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष

शरद पवार म्हणाले की, राज्यात अनेक प्रश्न आणि समस्या आहेत.. सरकारकडून अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं आहे. महाराष्ट्रातून गेल्या 6 महिन्यांत किती कारखाने गुजरातला गेले, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. तसंच, कारखाने दुसऱ्या राज्यात गेल्यानं स्थानिकांची संधी गेली, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.

जनताच त्यांना जागा दाखवेल

- Advertisement -

शरद पवार पुढे म्हणाले की, अनिल देशमुख 14 महिने जेलमध्ये गेले होते मात्र त्यांनी सांगितलं की काही केलं नाही त्यामुळे मी तुमच्यासोबत येणार नाही. पक्षांतर केलं म्हणजे काय केलं भाजपच्या दावणीला जाऊन बसलेत, आज भाजप जे सांगेल ते त्यांना करावं लागत आहे. आमच्या बाजूने या अन्यथा आम्ही दुसऱ्या ठिकाणी पाठवू , दुसऱ्या जागेची भीती म्हणून आपल्या सहकारी भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. आज नाहीतर, उद्या अशा व्यक्तींना समाजातील लोकं त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.

तुम्हाला कुणी दमदाटी करत का? याची दखल पक्षातून घेतली जाणार, सत्ता असो की नसो, खटले भरले जातात. न्यायव्यवस्था अजून जीवंत आहे. प्रत्येक जिल्ह्यात लीगल टीम तयार करून, सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांना त्रास झाला तर त्याला लीगल टीम मदत करेल. अलीकडे आपल्यातील काही लोकं पक्षाबाहेर गेले आहेत. आम्ही विकासासाठी तिकडे गेलो असं त्यांच्याकडून सांगितलं जातं, मात्र त्यात काही अर्थ नाही. मात्र, काही लोकांमागे ईडी लागली होती, त्यामुळे ते लोक तिकडे गेलेत, असंही पवार यावेळी म्हणाले.

- Advertisment -